दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : अकोला आणि अमरावती शहरामध्ये पुन्हा लॉकडाऊन जाहीर होणार आहे. कोरोनाची रुग्ण संख्या वाढल्याने हा निर्णय घेण्यात आलाय. इथला कोरोना पॉझिटिव्ह रेट ५० टक्के आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


राज्यात लॉकडाऊनची पुन्हा सुरुवात झाली आहे. अकोला अमरावती जिल्ह्यात आज लॉकडाऊन लागू होणार आहे. इतर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची आकडेवारी आटोक्यात आली नाही तर तिथेही पुन्हा लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



राज्यातील रुग्णसंख्या वाढली 


राज्यात रूग्णसंख्येत पुन्हा कमालीची वाढ व्हायला लागलीय. बुधवारी आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातला कोरोना पॉझिटिव्हिटी रेट पुन्हा ८ टक्क्यांच्या पुढे गेलाय. जानेवारीत कोरोनाच्या पॉझिटिव्हिटी रेटमध्ये कपात झाली होती. रेट 5 टक्क्यांवर आला होता. त्यामुळे राज्यात अनेक सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्या होत्या. 


मात्र आता पुन्हा रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येतेय. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत रूग्णवाढीचा दर 5 टक्के होता. मात्र गेल्या आठवड्यात तो अचानक दुप्पट झालाय. 


फेब्रुवारीच्या १५ आणि १६ तारखेला राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट तब्बल ९ टक्क्यांवर गेलाय. विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्णवाढीचा दर झपाट्याने वाढतोय.