कोल्हापूर : कोरोनाचा फैला सर्वत्रच दिसून येत आहे. जगामध्ये महाभयंकर विषाणू पसरला आहे. त्याची लोकांच्या मनामध्ये भीती आहे. पण त्याची तीव्रता त्यांना माहिती नाही, असे दिसून येत आहे. तसेच लॉकडाऊन ही संकल्पना लोकांना माहिती नव्हती. त्यामुळे त्यांचा भीतीमुळे गोंधळ झाला. म्हणून लोकांनी भाजीपाला आणि किराणा माल खरेदी करण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे शासनाने काही नियम कडक केले आहोत. भाजीपाला ही जीवनावश्यक वस्तू आहे; त्याची यंत्रणा सरकारने उभी केली आहे. पहिल्या दोन दिवसात संभ्रम निर्माण झाला. ग्राहकाने घबराहटीने गर्दी केली. आता सगळे सुरळीत होईल, असा विश्वास सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब थोरात यांनी  व्यक्त केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारने हमाल; अडते आणि इतर घटकांशी चर्चा केली; आणि त्यानंतर सगळं आत्ता सुरळीत झाले आहे. आजपासून जी यंत्रणा उभी केली आहे; या यंत्रणेमुळे भाजी पुरावठा सुरळीत होईल. एका मंडईमध्ये सर्व ग्राहकाने गर्दी करु नये. वाढीव दराने भाजीपाला विकला जावू नये यासाठी सरकार खबरदारी घेणार आहे. हमाल आणि ग्राहक या दोघांच्या मनामध्ये भीती, ती आता दूर होईल, असे ते म्हणालेत.


हमालांनी मार्केट यार्डमध्ये यावे यासाठी बाबा आढाव यांनी पुढाकार घेतला आहे. पुन्हा यंत्रणा पूर्ववत व्हावे यासाठी प्रयत्न केला जात आहे. लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना भाजीपाला मिळेल अस मी सर्वाना आश्वस्त करतो. 


दरम्यान, आधी सरकारचं आवाहन झुगारून रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर जशी टीका झाली, तशीच बुधवारी पोलिसांनी केलेल्या मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनुकूल -प्रतिकुल मते सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामुळे सरकारला आता एकीकडे कोरोनाच्या आपत्तीशी वैद्यकीय पातळीवर लढावे लागत आहे. तर दुसरीकडे लॉकडाऊनमध्ये घरातच असलेले नागरिक आणि हातावर पोट असलेले कष्टकरी यांच्या अडचणी दूर करण्याचं आव्हानही आहे. शिवाय कमी मनुष्यबळ घेऊन राबणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेसह हे आव्हान पेलावं लागणार आहे.