शिर्डी : भाजपा सेनेची युती गेल्या तीस वर्षांपासुन आहे मात्र या वेळी झालेली युती ही मागच्या युती पेक्षा अधिक घट्ट असल्याचा विश्वास युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी कोपरगाव येथील जाहीर सभेत व्यक्त केला. मात्र देशात एनडीचा आकडा किती असेल ? या बाबत ते साशंक असल्याच त्याच्या भाषणातुन दिसुन आले. शिर्डी लोकसभेचे युतीचे उमेदवार सदाशील लोखंडे यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंची कोपरगाव येथे जाहीर सभा आयोजीत करण्यात आली होती. या वेळी ठाकरेंनी राष्ट्रवादी कॉग्रेसवर टीका करताना भ्रष्ट्रवादी कॉग्रेस असा उल्लेख करत जोरदार टिका केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


महाराष्ट्रात फक्त भगवी लाट आहे. स्वतःची कामे न करता लोकांची कामे खासदारांनी केली. भ्रष्टवादी काँग्रेसची भ्रष्ट कामे सुधारण्याचे काम आम्हाला कराव लागत आहे असेही ते म्हणाले. कोपरगावातील पाणी प्रश्न  बिकट असून पाण्यासाठी कुठे जाण्याची वेळ आली तर मी स्वतः येईल असे अश्वासनही आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिले. पाण्याचा प्रश्न नक्की लवकरात लवकर मार्गी लावल्याशिवाय शांत बसणार नाही असेही ते म्हणाले


.


मतदान हे तुमचे सर्वात मोठे शस्त्र असून ते तुम्ही बजावा त्यामुळे चांगले लोक निवडून येतात असे सांगत त्यांनी मतदानासाठी आवाहन केले.  
सत्ता येणारच आहे. एका बाजूला मजबूत तर एका बाजूला मजबुर सरकार आहेत असा टोला त्यांनी लगावला. बंडखोर उमेदवार वाकचौरेंवर यावेळी आदित्या ठाकरे यांनी टिका केली.  भाऊसाहेबांनी धोका दिल्याचे ते म्हणाले.