मुंबई : सीपीआयचे महासचिव सीताराम येचुरी यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झालाय. येचुरी यांनी आपलं नाव बदलून अफजल खान, बाबर, औरंगजेब असे ठेवायला हवे असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी येचुरींवर टीका केली आहे. हिंदू हिंसक नसल्याचा दावा खरा आहे का? असा प्रश्न विचारत येचुरी यांनी थेट रामायण आणि महाभारताचा उल्लेख केल्याने हा वाद निर्माण झाला आहे. रामायण आणि महाभारतात हिंसक घटना आणि युद्धाचा उल्लेख आहे. संघाचे प्रचारक म्हणून ही बाजू सांगितलीच जात नाही. एका विशिष्ट धर्माची लोकंच हिंसा करतात, हिंदू हिंसा करत नाही हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. रामायण-महाभारतातही हिंसा आहे, मग हिंदू हिंसक नसतात हे कसं सांगणार, असा सवालही येचुरी यांनी केला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


आगामी निवडणुकीत महाआघाडी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदावरून दूर करेल. महाआघाडीकडे नरेंद्र मोदींसाठी पर्याय आहे. लोकसभा निवडणुकीतील तीन टप्प्यानंतर भाजपाला पराभवाचे संकेत मिळू लागले आहेत. या भीतीपोटीच भाजपाने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली. साध्वी प्रज्ञा यांना रिंगणात उतरवून भाजपा मूळ मुद्द्यांवरुन लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा येचुरी यांनी केला होता.



राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकांकडून वेळोवेळी या ग्रंथांमधील पराक्रमाचा दाखलाही दिला जातो. मग तरीही हिंदू लोक अहिंसक आहेत, असा दावा ते कसे करु शकतात? तसेच विशिष्ट धर्माचाच हिंसेशी संबंध आहे आणि हिंदू लोकांचा नाही, या दाव्यात कितपत तथ्य आहे, असा सवालही येचुरी यांनी केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गोहत्याबंदीच्या नावाखाली स्वत:ची खासगी सेना उभारल्याची टीकाही यावेळी त्यांनी केली.