सागर कुलकर्णी, मुंबई :  भाजपनं 2024 लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. राज्यात भाजपनं ज्या 16 लोकसभा मतदारसंघात युतीत शिवसेना निवडणूक लढवत असल्यामुळे कधीही निवडणूक लढवली नाही त्याठिकाणी भाजपनं लक्ष केंद्रीत केलं आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपनं मास्टर प्लान आखला आहे. भाजपनं एका मतदारसंघाची जबाबदारी एका नेत्याकडे दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ठाणे, कल्याण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, औरंगाबाद, हिंगोली, परभणी, अमरावती, नाशिक, शिरूर यासह सोळा लोकसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघांमध्ये भाजप नेत्याकडे जबाबदारी दिली जाईल. त्यासंदर्भातच देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विनोद तावडे यांच्या उपस्थितीत मुंबईत आज एक महत्त्वाची बैठक होतेय.  यासह सोळा लोकसभा मतदारसंघ जिथे तयारी करायची आहे तिथले भाजपाचे स्थानिक नेते उपस्थित राहणार आहेत. 


भाजपचा मास्टर प्लॅन


देशात 113 लोकसभा मतदारसंघ आणि राज्यात 16 लोकसभा मतदारसंघ निवडण्यात आले. जिथे भाजप यापूर्वी निवडणूक लढवली नाही आणि जिंकलेली देखील नाही या मतदारसंघांमध्ये भाजपा केंद्र सरकार वेगवेगळ्या योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहचवणार आहे.


तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं लोकांसमोर मांडणार आहे. यासाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात बूथ कमिटी नेमून भाजप सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहचवण्यात येणार येईल. 


आजच्या बैठकीत या संदर्भात माहिती देताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, ''भाजप व कायम वेगवेगळ्या निवडणुकीची तयारी करत असतं, आगामी निवडणुकीच्या दृष्टीने आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे. भविष्यात भाजप अधिक प्रबल होण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करण्याचे काम आजच्या बैठकीत चर्चा केली जाईल.