Maharashtra Lok Sabha Result 2024 Devendra Fadnavis: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये 'मला सरकारमधून मोकळं करा' अशी मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला अपेक्षित यश मिळाल्यानंतर फडणवीसांनी केलेल्या या विधानामुळे महाराष्ट्रात राजकीय भूंकप होणार असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे.


"मला सरकारमधून मोकळं केलं तर..."


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"जागा कमी आल्यात हा फॅक्ट आहे. या निवडणुकीचं नेतृत्व भाजपामध्ये मी करत आहे. जो पराभव झाला, ज्या जागा कमी झाल्या त्याची जबाबदारी माझी आहे. मी हे मान्य करतो की मी कुठेतरी यामध्ये स्वत: कमी पडलो आहे. मी ती कमतरता भरुन काढण्याचा प्रयत्न करणार. भाजपाला महाराष्ट्रात जो काही सेटबॅक सहन करावा लागला त्याची सगळी जबाबदारी मी स्वीकारत आहे," असं फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले. "मी भाजपाकडे अजून विनंती पक्षाकडे करणार आहे. भाजपामध्ये सगळे निर्णय पक्षच करतो. मला विधानसभेकरता पूर्णवेळ उतरायचं आहे. मी आघाडीच्या नेतृत्वाला विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं. ज्यामुळे मला पक्षासाठी काम करता येईल,. ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मला माझा पूर्ण वेळ देता येईल," असं फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले.


मी सरकारबाहेर राहिलो तरी...


"अर्थात मी सरकारच्या बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये आम्हाला जे काही करायचं आहे ते आम्ही करणार आहोतच. त्या टीमसोबत मी असेन. यासंदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहे. त्यानंतर त्यांच्या सल्ल्याने ते जे सांगितील त्यानुसार मी पुढची कारवाई करेन," असंही फडणवीस म्हणाले.


नक्की वाचा >> NDA च्या मित्राचाच नितीन गडकरींच्या मंत्रालयावर डोळा! उपसभापतीपद सुद्धा मागितलं


फक्त दोन लाख मतांचा फरक


"आम्हाला अपेक्षित यश मिळालेलं नाही. आमच्या अपेक्षेपेक्षा खूप कमी जागा मिळाल्या आहेत. आमची लढाई महाविकास आघाडीच्या पक्षांशी होती. तशी नरेटीव्हबरोबर लढाई सुद्धा होती. संविधान बदलण्याचा नरेटीव्ह तयार केलेला तो थांबवण्यात आम्हाला यश आलं नाही. जनतेनं जो जनादेश दिलेला आहे तो शिसरावंद मानून आम्ही पुढची तयारी करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना जास्त जागा मिळाल्या त्यांचं अभिनंदन करतो. मात्र काही गोष्टी निश्चितपणे मांडल्या गेल्या पाहिजेत. कारण निवडणुकीचं एक गणित असतं. यामध्ये आम्ही पराभूत झालो असं माझं मत आहे. याच्या बऱ्याच मिमंसा असू शकतात. एकूण महाविकास आघाडीला 43.91 टक्के मतं मिळाली. आम्हाला 43.60 टक्के अर्धा टक्क्यापेक्षाही कमी फरकाने आम्ही मागे पडलो. मात्र विजयी जागांचे नंबर जो पहायला मिळतोय तो 17 आणि 30 आहेत. मतांमध्ये बघितलं तर महाविकास आघाडीला 2 कोटी 50 लाख मतं मिळाली. महायुतीला 2 कोटी 48 लाख मतं मिळाली, म्हणजे फक्त दोन लाख मतांचा फरक आहे," असं फडणवीस यांनी स्पष्ट करुन सांगितलं.