NDA च्या मित्राचाच नितीन गडकरींच्या मंत्रालयावर डोळा! उपसभापतीपद सुद्धा मागितलं

Lok Sabha Election 2024 TDP Demad form NDA: एनडीएमधील घटकपक्ष असेलल्या टीडीपी आणि जेडीयू या दोन घटकपक्षांवर सत्तास्थापनेचं सारं गणित अवलंबून आहे. असं असतानाच आता अचानक या दोन्ही पक्षांचं महत्त्व फारच वाढलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 5, 2024, 03:14 PM IST
NDA च्या मित्राचाच नितीन गडकरींच्या मंत्रालयावर डोळा! उपसभापतीपद सुद्धा मागितलं title=
सत्तास्थापनेसाठी भाजपाला करावी लागणार तडजोड

Lok Sabha Election 2024 TDP Demad form NDA: लोकसभा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील निवडणुकीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला अपेक्षित यश मिळालेलं नाही. त्यामुळेच आता सत्तास्थापनेसाठी तेलगु देसम पार्टी (टीडीपी) तसेच जनता दल युनायटेडवर (जेडीयू) एनडीएला अवलंबून रहावं लागणार आहे. एनडीने या दोन्ही घटक पक्षांचा समावेश करुन 292 जागांवर विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीला 234 जागांवर यश मिळालं असून 17 अपक्ष निवडून आले आहेत. असं असतानाच आता सत्ता स्थापनेसाठी आम्ही सुद्धा शर्यतीत असल्याचे सूचक संकेत इंडिया आघाडीनेही दिले आहेत. विशेष म्हणजे यासाठी टीडीपी आणि जेडीयूला अनन्यसाधारण महत्त्व मिळालं आहे. टीडीपीचे चंद्राबाबू नायडू तसेच जेडीयूचे नितीश कुमार खरे 'किंगमेकर' ठरणार आहेत अशी स्थिती आहे. असं असतानाचा आता टीपीडीने थेट मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री असेलल्या नितीन गडकरींचं मंत्रालयाबरोबच अन्य अनेक मागण्या एनडीएच्या घटकपक्षांसमोर ठेवलं आहे. 

टीडीपीला काय हवंय?

टीडीपीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी एनडीकडे 5-6 कॅबिनेट आणि राज्यमंत्री पदांची मागणी केली आहे. त्याचबरोबर टीडीपीकडून लोकसभा अध्यक्ष पदाचीही मागणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे टीडीपीने ज्या मंत्रालयांची मागणी केली आहे त्याची यादी समोर आली आहे. रस्ते वाहतूक मंत्रालय, ग्राम विकास, आरोग्य, गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार, शेती, जलशक्ती, माहिती तंत्रज्ञान आणि कम्युनिकेशन, शिक्षण मंत्रालयाबरोबरच अर्थमंत्रालयातील राज्यमंत्रीपदही टीडीपीला हवं असल्याची मागणी एनडीएच्या घटकपक्षांकडे करण्यात आली आहे.  

गडकरींचं मंत्रालय

मोदी सत्तेत आल्यापासून रस्ते वाहतूक मंत्रालय नितीन गडकरींकडे आहे. नितीन गडकरींनीही यंदाही नागपूरमधून बाजी मारत लोकसभेत धडक मारली असून त्यांच्याकडे हे मंत्रालय कायम राहील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र आता टीडीपीने गडकरींकडील हे मंत्रालय मागितल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता भाजपा आणि एनडीएचे घटकपक्ष या मंत्रालयाबरोबरच टीडीपीच्या इतर मागण्या मान्य करते का हे पाहणं महत्त्वाचं आहे. एनडीएने ही मागणी मान्य केली तर गडकरींना त्यांचं मागील 10 वर्षांपासूनचं मंत्रीपद सोडावं लागणार आहे.

नक्की वाचा >> 'मोदी स्वतःला हिंदूंचे नवे शंकराचार्य..', ठाकरे गटाची सडकून टीका; म्हणाले, '400 पारचा नारा..'

दोन्ही बाबूंची बार्गेनिंग पॉवर किती?

चंद्राबाबू आणि बिहारमध्ये नितीशबाबू नावाने प्रसिद्ध असलेले नितीश कुमार या दोघांच्या पक्षांकडे किती जागा आहेत असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे का? तर टीडीपी आणि जेडीयूकडे एकूण 28 जागा आहेत. यापैकी टीडीपीकडे 16 तर जेडीयूकडे 13 जागा आहेत. या दोघांच्या 28 जागा एनडीएच्या एकूण 292 जागांमधून वजा केल्यास एनडीएच्या जागांची संख्या 264 वर जाते. हा आकडा बहुमताच्या 272 पासून 8 जागांनी दूर आहे.

नक्की पाहा >> 'मला विश्वास आहे की आपण भविष्यात एकत्र..', मोदींच्या विजयावर 'सेल्फी फ्रेंड' मेलोनींची पोस्ट

कोणाला किती जागा?

भाजपा - 240
काँग्रेस - 99
समाजवादी पार्टी - 37
तृणमूल काँग्रेस - 29
डीएमके - 22
टीडीपी - 18
जेडीयू - 12
उद्धव ठाकरे शिवसेना - 9
शरद पवार राष्ट्रवादी - 8
शिवसेना शिंदे गट - 7
लोकशक्ती पार्टी (राम विलास) - 5
युवाजन श्रमीत रायथू काँग्रेस पार्टी - 4 
राष्ट्रीय जनता दल - 4
सीपीआय (एम) - 4
इंडियन मुस्लीम लीग - 3
आप - 3
झारखंड मुक्ती मोर्चा - 3
जनसेना पार्टी - 2
सीपीआय (एम) (एल) - 2


जनता दल सेक्युलर - 2
व्हीसीके - 2
सीपीआय - 2
आरजेडी - 2
जेकेएन - 2
युपीपीएल - 1
एजीपी - 1
हिंदुस्तानी आवाम मोर्चा  - 1
केरळ काँग्रेस  - 1
रेव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी - 1
राष्ट्रवादी काँग्रेस - 1
व्हॉइस ऑफ पीपल पार्टी  - 1
झोरमा पिपल्स मुव्हमेंट झेडपीएम - 1
शिरोमणी अकाली दल - 1
राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी - 1
भारत आदिवासी पार्टी - 1
सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा - 1
एमडीएमके  - 1
आझाद समाज पार्टी (कांशी राम) - 1
अपना दल (सोनियाल) - 1
एजेएसयू पार्टी  - 1
एआयएमआयएम - 1
अपक्ष - 7