Loksabha 2024 :  लोकसभा निवडणूक 2024 साठी महाविकास आघाडीचं जागावाटप अखेर जाहीर झालंय. काँग्रेस 17, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 10 आणि  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 21 जागांवर लढणार आहे. विशेष म्हणजे सांगलीची (Sangli) जागा काँग्रेसनं (Congress) शिवसेनेसाठी (Shivsena) सोडली तर भिवंडीच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे. मुंबईत शिवसेना 4 तर काँग्रेस 2 जागांवर लढेल. उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईच्या जागेवर काँग्रेस लढणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मविआच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, संजय राऊत, जयंत पाटील या नेत्यांनी मविआचं (Mahaviaks Aghadi) जागावाटप (Seat Sharing) जाहीर केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असं आहे मविआचा जागा वाटप फॉर्म्युला
काँग्रेस : नंदूरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमुर, चंद्रपूर, नाणेर, जालना, मुंबई उत्तर-मध्य,  उत्तर मुंबई, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक


राष्ट्रवादी शरद पवार गट : बारामती, शिरुर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर-दक्षिण, बीड


शिवसेना ठाकरे गट : जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशीव, रत्नागिरी, बुलढाणा, हातगलंगणे, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, उत्तर-पश्चिम मुंबई, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण,  मुंबई ईशान्य


मविआ नेत्यांची बैठक
मविआच्या पत्रकार परिषदेनंतर सर्व नेत्यांची शिवलयात बैठक झाली. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. संयुक्त प्रचार सभांचे नियोजन, प्रचार रणनिती यावर बैठकीत चर्चा झाली. मविआतील इतर घटक पक्षांचे नेतेही या बैठकीत सहभागी झाले होते. 


जागावाटपानंतर काँग्रेसमध्ये नाराजी
सांगलीची जागा ठाकरेंकडे गेल्यानंतर जिल्हा काँग्रेसच्या कार्यालयात शुकशुकाट पसरला आहे. विश्वजीत कदम, विशाल पाटील (Vishal Patil) आणि विक्रम सावंत नॉट रिचेबल आहेत तर मुंबईत समाधानकारक जागा न मिळाल्यानं वर्षा गायकवाड नाराज झाल्यात. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची बुधवारी बैठक होणार आहे. विश्वजित कदम, विशाल पाटील, विक्रम सावंत, जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज पाटील अशा प्रमुख नेत्यांची उद्या बैठक होणार आहे. कार्यकर्ते आणि नेत्यांच्या चर्चेनंतर विशाल पाटील अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलीय.. उद्या 11 वाजता ही बैठक होणार आहे..