लोकसभा निवडणूक २०१९ : बीड मतदारसंघातील `रणसंग्राम`
लोकसभा निवडणुकीसाठी बीड मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यामध्ये १८ एप्रिलला मतदान होणार आहे.
बीड : लोकसभा निवडणुकीसाठी बीड मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यामध्ये १८ एप्रिलला मतदान होणार आहे. राज्यामध्ये भाजप-शिवसेनेची युती तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. या निवडणुकीत बीड मतदारसंघात भाजपकडून प्रीतम मुंडे यांना तर राष्ट्रवादीकडून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून विष्णू जाधव निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
२०१४ निवडणुकीचे निकाल
२०१४ साली बीडमधून गोपीनाथ मुंडे यांनी सुरेश धस यांचा १,३६,४५४ मतांनी पराभव केला होता. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर बीडमध्ये पुन्हा पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे यांचा विजय झाला. आता भाजपने पुन्हा एकदा प्रीतम मुंडे यांना उमेदवारी दिली आहे.
२०१४ निवडणुकीची आकडेवारी
उमेदवार |
पक्ष |
मिळालेली मतं |
गोपीनाथ मुंडे | भाजप | ६,३५,९९५ |
सुरेश धस | राष्ट्रवादी काँग्रेस | ४,९९,५४१ |
दिगंबर राठोड | बसपा | १४,१६६ |
प्रकाश सोळंके | अपक्ष | ८,६३४ |
अशोक सोनावणे | अपक्ष | ५,३८३ |