लोकसभा निवडणूक : महाराष्ट्रातील काँग्रेसची पाचवी यादी जाहीर, चंद्रपूरचा उमेदवार बदलला
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची महाराष्ट्रातली चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची महाराष्ट्रातली चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. हिंगोलीतून काँग्रेसने सुभाष वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे. २०१४ साली हिंगोलीमधून राजीव सातव हे निवडून गेले होते. मुख्य म्हणजे २०१४ साली काँग्रेसने ज्या दोन जागा जिंकल्या होत्या, त्यामध्ये राजीव सातव यांची एक जागा होती. हिंगोलीशिवाय काँग्रेसने अकोल्यातून हिदायत पटेल, रामटेकमधून किशोर गजभिये यांना उमेदवारी दिली आहे. तर नाराजीनंतर चंद्रपूरमधून काँग्रेसने विनायक बागडे यांची उमेदवारी रद्द केली आहे. बागडे यांच्याऐवजी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या बाळू धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान याआधी सकाळीच काँग्रेसने महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना नांदेडमधून उमेदवारी दिली आहे.
काँग्रेसने आत्तापर्यंत जाहीर केलेले उमेदवार
१ हिंगोली- सुभाष वानखेडे
२ अकोला- हिदायत पटेल
३ रामटेक- किशोर गजभिये
४ चंद्रपूर- बाळू धानोरकर
५ औरंगाबाद- सुभाष झांबड
६ जालना- विलास औताडे
७ भिवंडी- सुरेश टावरे
८ लातूर- मच्छींद्रनाथ कामत
९ नंदुरबार- के.सी.पडवी
१० धुळे- कुणाल रोहिदास पाटील
११ वर्धा- चारुलता टोकस
१२ मुंबई दक्षिण मध्य- एकनाथ गायकवाड
१३ यवतमाळ-वाशिम- माणिकराव ठाकरे
१४ शिर्डी- भाऊसाहेब कांबळे
१५ रत्नागिरी-सिंधुदुर्ग- नवीनचंद्र बांदिवडेकर
१६ नागपूर- नाना पटोले
१७ सोलापूर- सुशीलकुमार शिंदे
१८ मुंबई उत्तर-मध्य- प्रिया दत्त
१९ मुंबई दक्षिण- मिलिंद देवरा
२० गडचिरोली-चिमुर- नामदेव उसंडी
२१ नांदेड- अशोक चव्हाण