हातकणंगले : हा राजू शेट्टी यांचा मतदारसंघ आहे. देशपातळीवरील शेतकरी नेता म्हणून त्यांची ओळख आहे. या मतदारसंघात शेतक-यांचा त्यांना भकम पाठिंबा आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला आहे. तर शिवसेनेने धैर्यशिल माने यांना मैदानात उतरवलं आहे. माने यांच्यासाठी युतीच्या आमदारांवर त्यांचा विजय अवलंबून आहे. वंचित आघाडीने अस्लम सय्यद यांना उमेदवारी दिली आहे. 23 एप्रिलला येथे मतदान होणार आहे.


आमदार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हातकणंगले - आमदार डॉ. सुजित मिणचेकर (शिवसेना)
शिरोळ - आमदार उल्हास पाटील (शिवसेना)
शाहूवाडी- आमदार सत्यजित पाटील (शिवसेना)
इचलकरंजी - आमदार सुरेश हाळवणकर (भाजप)
शिराळा - आमदार शिवाजीराव नाईक (भाजप)
वाळवा - आमदार जयंत पाटील (राष्ट्रवादी)


२०१४ निवडणुकीचा निकाल


२०१४ साली राजू शेट्टी यांना ६ लाख ४० हजार मतं मिळाली होती. कल्लाप्पा आवाडे यांचा १ लाख ७७ हजार मतांनी पराभव झाला होता.


 


२०१४ निवडणुकीची आकडेवारी


उमेदवार

 पक्ष

 मतदान

राजू शेट्टी स्वा. शे. संघटना 640428
कल्लापा आवाडे काँग्रेस 462618
सुरेश पाटील अपक्ष 25648
चंद्रकांत कांबळे बसपा 11499
नोटा नोटा 10059