जयेश जगड, झी २४ तास, अकोला : गुरुवारी नरेंद्र मोदी हे त्यांच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. याच दिवशी त्यांच्यासह इतर नवनिर्वाचित मंत्रीही शपथ घेणार आहेत. या नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या संजय धोत्रे यांचीही वर्णी लागली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीत महाराष्ट्राच्या मंत्र्यांमधील संजय धोत्रे यांच्या वाट्याला आलेली ही जबाबदारी पाहता त्यांच्यावर समर्थकांच्याही नजरा खिळल्या आहेत. चला तर मग, नजर टाकूया त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासावर... 


अकोला जिल्ह्यातील सहकार आणि राजकीय क्षेत्रातील मोठे नाव असणाऱ्या 'धोत्रे घराण्या'तील संजय धोत्रे हे दुसऱ्या पिढीचे नेतृत्व करत आहेत. संजय धोत्रे यांचे वडील शामराव धोत्रे हे मुर्तीजापूर मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले होते. तर त्यांचे काका आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री वसंतराव धोत्रे हेसुद्धा अकोला जिल्ह्यातील सहकार आणि राजकीय क्षेत्रातील अतिशय मोठे नाव आहे.  


संजय धोत्रे खासदार होण्याआधी १९९९ ते २००३ या काळात मुर्तीजापूर विधानसभा मतदार संघातून भाजपचे आमदार होत आहे. त्यानंतर २००४ पासून आतापर्यंत ते सलग अकोल्याचे खासदार म्हणून भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. संजय धोत्रे सलग चौथ्यांदा अकोल्यातील खासदार म्हणून नेतृत्व करत आहेत. त्यांचा जन्म  २६  फेब्रुवारी १९५९ अकोल्यात झाला होता. आपले महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी नागपूर येथून पूर्ण केले.


संजय धोत्रे हे व्यवसायाने अभियंते आणि शेतकरी आहेत. B.E ( मेकॅनिकल ) पर्यंतचं त्यांनी शिक्षण घेतलं आहे. तर मागील वर्षी त्यांनी वकिलीची पदवीही घेतली. 


खासदार म्हणून धोत्रे यांच्या जमेच्या बाजी 


- सहज उपलब्ध होणारे खासदार


- जनतेशी असलेला सहज संवाद आणि 'ग्राउंड लेव्हल लीडर'ची प्रतिमा.


- पक्षात नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असल्याने पक्षात मोठे वजन.


- पक्षात मोठे वजन


- सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांशी असलेला चांगला संवाद


- लोकांच्या सुख-दुखात सहज सहभाग.