लोकसभा निवडणूक २०१९ : वर्धा मतदारसंघातील `रणसंग्राम`
लोकसभा निवडणुकीसाठी वर्धा मतदारसंघात पहिल्या टप्प्यामध्ये ११ एप्रिलला मतदान होणार आहे.
वर्धा : लोकसभा निवडणुकीसाठी वर्धा मतदारसंघात पहिल्या टप्प्यामध्ये ११ एप्रिलला मतदान होणार आहे. राज्यामध्ये भाजप-शिवसेनेची युती तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातून भाजप-शिवसेना युतीने सगळ्या १० जागांवर विजय मिळवला होता.
या निवडणुकीत वर्धा मतदारसंघात भाजपने रामदास तडस यांना उमदेवारी दिली आहे. रामदास तडस यांचा सामना काँग्रेसच्या चारुलता टोकस यांच्याशी असेल. वंचित बहुजन आघाडीकडून धनराज वंजारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
२०१४ निवडणुकीचे निकाल
२०१४ सालच्या निवडणुकीमध्ये वर्ध्यातून भाजपच्या रामदास तडस यांनी काँग्रेसच्या दत्ता मेघेंचा २,१५,७८३ मतांनी पराभव केला होता.
२०१४ निवडणुकीची आकडेवारी
उमेदवार |
पक्ष |
मिळालेली मतं |
रामदास तडस | भाजप | ५,३७,५१८ |
दत्ता मेघे | काँग्रेस | ३,२१,७३५ |
चेतन पेंडाम | बसपा | ९०,८६६ |
मोहम्मद अलीम पटेल | आप | १५,७३८ |
श्रीकृष्ण उबाळे | एआरपी | ६,४०५ |