Baramati Loksabha : लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर सध्या राज्यासह देशातील राजकीय वर्तुळात बऱ्याच घडामोडींना वेग आला असून, काही घडामोडी लक्ष वेधताना दिसत आहे. इथं अनेक नेत्यांची पक्षांतरं सुरु असतानाच तिथं बारामती मतदार संघावरून सुरु असणारा वाद काही केल्या संपण्याचं नाव घेत नाहीये. राज्याच्या राजकारणात अतिशय महत्त्वाचं स्थान असणाऱ्या बारामती मतदार संघाचा वाद आता थेट वरिष्ठांपर्यंत पोहोचला असून, त्याप्रकरणी नेतेमंडळींना समजही मिळाल्याची माहिती समोर येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बारामती लोकसभा मतदार संघातील वाद मिटवण्यासाठी सागर बंगल्यावर रात्री उशिरापर्यंत खलबतं सुरु असल्याचं पाहायला मिळालं. रविवारी रात्री 2 तास सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात चर्चा झाल्या. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हर्षवर्धन पाटलांना समज दिल्याची माहिती सूत्रांमार्फत मिळाली.


हेसुद्धा वाचा : Loksabha Election : कंगना रणौतला उमेदवारी; भाजपच्या 5 व्या उमेदवार यादीत मोठा उलटफेर


 


काय म्हणाले फडणवीस? 


राज्यातील बहुचर्चित आणि महत्त्वाच्या मतदारसंघातील वाद ऐरणीवर आल्याचं पाहून, 'बारामतीतील महायुतीचा जो उमेदवार असेल त्यासाठी काम करा' अशी समज फडणविसां हर्षवर्धन पाटील यांना दिल्याची माहिती समोर आली. 'महायुतीच्या उमेदवाराविरोधात कोणताही प्रचार करू नका. किंबहुना समर्थकांना सुद्धा तशी समज द्या', अशा थेट सूचनावजा निर्देश फडणविसांनी दिले. सध्या लोकसभेवर लक्ष केंद्रीत करत असल्याचं स्पष्टच सांगत, विधानसभेसंदर्भात निर्णय वेळ आल्यावर घेऊ. आता मात्र लोकसभेच्या उमेदवाराचा प्रचार करा असाच पुनरुच्चार त्यांनी केला.