Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray Interview : राज्यात लोकसभा निवडणुकांची प्रचारसभा सुरु आहेत. त्यातच आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एका मुलाखतीची चर्चा रंगली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना वृत्तपत्राला एक रोखठोक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल चढवला. यावेळी त्यांनी निवडणुका, कोरोना, राम मंदिर, राजकीय यंत्रणा यावरही भाष्य केले. आता या मुलाखतीवर भाजपने टीका केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्वीट केले आहे. यात त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. 'ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच. उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत', असं आव्हान चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे. 


चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्वीट


एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशभरातील अनेक माध्यमांच्या संपादकांना मुलाखती देत असताना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपलेच कर्मचारी असलेल्या संजय राऊत यांना मॅनेज मुलाखत दिली. ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच. उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यावीत.


१. दहशतवादी कसाबचं समर्थन करणाऱ्या काँग्रेस आणि  विजय वडेट्टीवार यांच्याबद्दल तुमची भूमिका काय ?
२. १९९३ च्या मुंबई बाँबस्फोटातील गुन्हेगार तुमच्या उमेदवाराच्या प्रचारात का होता ?, हा देशद्रोही प्रचारात बघून तुम्हाला लाज वाटली नाही का ?
३. सत्तेवर आल्यास हिंदुची संपत्ती मुस्लिमांना वाटण्याचा काँग्रेसचा मनसुबा आहे त्यावर तुम्ही मूग गिळून गप्प का बसलात ?
४. राहुल गांधी आणि काँग्रेसचे चेलेचपाटे सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात त्याबद्दल तुम्ही गप्प का आहात ?
५. उदयनिधी स्टॅलिन हा हिंदू धर्म संपवण्याची धमकी देतो आणि तुम्ही त्याच्या मांडीला मांडी लावून का बसला होता ?


उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान आहे की, हिंमत असेल तर एक मुलाखत देऊन त्यांनी या प्रश्नांचीही उत्तरं द्यावीत, महाराष्ट्रातील जनता या उत्तरांची वाट पाहत आहे. जय महाराष्ट्र!, असे ट्वीट चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं आहे.



दरम्यान उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला. "मोदी संपूर्ण राज्यभर फिरतायत. आता मला वाटतं, एखाद्या गल्लीबोळातही रोड-शोसुद्धा करतील. आणि त्यांनी तो करावा. महाराष्ट्र कसा आहे? महाराष्ट्राचा आक्रोश आणि महाराष्ट्राचा संताप हा त्यांनी अनुभवला पाहिजे. महाराष्ट्राचं प्रेम आणि आशीर्वाद त्यांना दहा वर्षे मिळाला आहे. आता महाराष्ट्राचा शाप काय असतो, हा मोदीजींनी अनुभवावा", असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.