कैलाश पुरी, झी 24 तास, पुणे: पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात 13 मे ला मतदान होतंय.  या मतदार संघात अजूनही म्हणावा तसा प्रचाराचा जोर चढला नाही. असे असले तरी मावळ लोकसभा मतदारसंघात सध्या केंद्रीय पथकाची चांगलीच चर्चा सुरू आहे. हे पथक आले की नाही? याची कुणालाच कल्पना नसताना हा मुद्दा मात्र चांगलाच गाजत आहे... काय आहे हा मुद्दा? सविस्तर जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे जिल्ह्यातील लक्षवेधी लढत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात 7 मेला मतदान होत आहे. बारामतीलाच लागून असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षाचे म्हणावे असे लक्ष नाही. इथं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संजोग वाघेरे आमने-सामने आहेत. 


दोन्ही उमेदवाराकडून मतदार संघ पिंजून काढण्याचं काम सुरू आहे. मात्र या मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करताना झालेले शक्ती प्रदर्शन वगळता कोणताही मोठा नेता फिरकलेला नाही. दुसरीकडे उमेदवार वैयक्तिक गाठीभेटींवर भर देत असताना महायुतीमध्ये मात्र सहयोगी पक्षांकडून प्रचार केला जात नसल्याची जोरदार चर्चा आहे.


पदवीधर बेरोजगाराला नोकरी, गरीब महिलेच्या खात्यात दरवर्षी 1 लाख- राहुल गांधींचे आश्वासन 


त्याच पार्श्वभूमीवर भाजपकडून प्रचार यंत्रणेवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय पथक आल्याची मतदार संघात जोरदार चर्चा आहे.. मुख्य प्रचार सोडून लोकसभा मतदारसंघात सध्या या केंद्रीय पथकाचीच चर्चा आहे.. अर्थात हे केंद्रीय पथक नेमकं कुठं काम करतंय? याची महायुतीतल्या उमेदवारासह स्थानिक नेत्यांनाही माहिती नाही.


आता मावळमध्ये आलेले हे केंद्रीय पथक स्थानिक नेत्यांवर कसा दबाव टाकते? हे सध्या तरी सांगणे कठीण आहे. कारण ते आल्याची कल्पना कोणालाच नाही...असं असलं तरी त्याची मतदार संघात चर्चा मात्र चांगलीच रंगली आहे हे मात्र तेवढेच खरे ..!


काँग्रेस की शिवसेना, आघाडीत कोण वाघ ? अतंर्गत संघर्षाचा निवडणुकीत बसणार फटका?