Loksabha Election 2024 Eknath Shinde Group Pressurise by BJP: महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटण्याच्या अंतिम टप्प्यावर असल्याचं सांगितलं जात असतानाच आता महायुतीसमोर उमेदवार बदलावा लागण्याचं नवीन आव्हान उभं राहिल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाने जाहीर केलेल्या 8 जागांपैकी 2 जागांवरील उमेदवार बदलला जाईल अशी जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे यासंदर्भातील माहिती शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनीच दिली आहे. संजय शिरसाट यांनी एखादा उमेदवार कमजोर वाटत असल्यास मुख्यमंत्री तो उमेदवार कधीही बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही असं म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर हिंगोलीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्याबरोबरच हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने यांची उमेदवारी रद्द करुन नवे उमेदवार दिले जाण्याची दाट शक्यता आहे. या ठिकाणी दुसरे उमेदवार देण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून एकनाथ शिंदेवर दाबव टाकला जात आहे की काय अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे.


फडणवीसांचं सूचक विधान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हिंगोलीमधील उमेदावारासंदर्भात सूचक विधान केल्याचं सांगितलं जात आहे. येथील ठरवण्याचा अधिकार हा शिवसेनेचा असून निवडून येणारा उमेदवार सुचवण्याचं काम आपण करु शकतो. प्रत्येकाने महायुतीचा धर्म पाळावा, असे निर्देश फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याचे समजते. 


एकूण 3 उमेदवार बदलण्याची चर्चा


संजय शिरसाट यांनीही थेट हिंगोली आणि हातकणंगले मतदारसंघाचा उल्लेख करत उमेदवार बदलले जाऊ शकतात असं म्हटलं आहे. दिलेला उमेदवार कमोजर असल्यासारखं वाटलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उमेदवार बदलू शकतात असं शिरसाट म्हणाले. त्यांनी यासंदर्भात बोलतानाच हिंगोली किंवा हातकणंगलेचा अथवा दोन्ही जागांवर हे असं काहीतरी होऊ शकतं असं शिरसाट यांनी स्पष्टपणे थेट मतदारसंघाचं उल्लेख करत म्हटलं. सध्या सुरु असलेल्या चर्चांनुसार हिंगोली आणि हातकणंगलेबरोबरच यवतमाळ-वाशिमचा उमेदवारही बदलला जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. 


शिंदे गटाने पहिल्या यादीत दिलेले उमेदवार?


राहुल शेवाळे – मुंबई दक्षिण मध्य


संजय मंडलीक – कोल्हापूर</p>


सदाशिव लोखंडे – शिर्डी (अनुसूचित जाती)


प्रतापराव जाधव – बुलढाणा</p>


हेमंत पाटील – हिंगोली


श्रीरंग बारणे – मावळ


राजू पारवे – रामटेक (अनुसूचित जाती)


धैर्यशिल माने – हातकणंगले



भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. असं असतानाच आता उमेदवार बदलण्यावरुन मोठा गोंधळ होण्याची चिन्हं दिसत आहेत.