नाशकातून गोडसेंना उमेदवारी? वरच्या पातळीवर काय ठरलं? छगन भुजबळांनी सर्वच सांगितलं
LokSabha Election 2024: वरच्या पातळीवर काहीतरी ठरल्याचा मला फोन आला. मी यावर विचार करतो, असं सांगितलं.
LokSabha Election 2024: मला तिकिटासाठी आग्रह नव्हता. किंवा मागणीसुद्धा नव्हती. पण महायुतीची दिल्लीमध्ये चर्चा झाली. त्यावेळी अचानक माझं नाव पुढे आलं. भुजबळांनी नाशकातून उभं राहावं,अशी चर्चा तिथे झाली. मला याची कल्पना नव्हती. वरच्या पातळीवर असं ठरल्याचा मला फोन आला. मी यावर विचार करतो, असं सांगितलं.
मी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत याबद्दल चर्चा केली. यानंतर ही बातमी खरी असल्याचे समजले. मला नाशकात उमेदवारी मिळणार असल्याची बातमी मीडियात गेली आणि नाशिक पुन्हा चर्चेत आले.
शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी विषय खूप लावून धरलाय. यामुळे पुन्हा चर्चा सुरु झाली. जागा त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडली त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसची निशाणी घड्याळ हेच चिन्ह असेल.
ठाण्याच्या जागेवर पंतप्रधान मोदी जरी उभे राहिले तरी आम्हीच जिंकणार-सुषमा अंधारे
मी मराठा समाजाला विरोध कधीच केला नाही. मी सपोर्ट केला. ओबीसीमध्ये नको वेगळे आरक्षण द्या, अशी मागणी केली. असा प्रस्ताव आला, त्यालाही मी सपोर्ट केला. ओबीसीच नव्हे तर इतर कोणाच्याच आरक्षणात वाटा घेऊ नका, असे मी म्हटलं.
निवडणूक निवडणुकीसारखी होऊ द्या, असे आवाहन भुजबळांनी मराठा कार्यकर्त्यांना केलं. मराठा कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडेंना काळे झेंडे दाखवले. पण प्रत्यक्षात त्यांनी आरक्षणाला कधीच विरोध केला नव्हता.