Loksabha Election 2024 : राज्यातील मोठ्या राजकीय पक्षांनीही महत्त्वाच्या मतदार संघांतील उमेदवारांची नावं जाहीर केलेली असतानाच काही मतदारसंघांबाबत असणारा तिढा मात्र काही केल्या सुटण्याचं नाव घेत नाहीये. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर असाच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला लोकसभा मदतादरसंघ म्हणजे नाशिक. सध्या नाशिकमध्ये सुरु असणारे राजकीय डावपेच राजकीय समीकरणांना एक वेगळं वळण देताना दिसत आहे. नाशिकच्या लोकसभा मतदारसंघासाठी तीन पक्षांमधील आजी-माजी पालकमंत्री आता थेट दावे सांगत असून या मतदारसंघातील वर्चस्वासाठी त्यांचा संघर्ष सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक आणि छगन भुजबळ या अलिखित समीकरणाचीच चर्चा यंदाज्या जागावाटपाच्या बातम्यांदरम्यान पाहायला मिळाली. तर, ही जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळायला हवी, असा आग्रही सूर पालकमंत्री दादा भुसे यांनी आळवत नाशिककरांचं नाव पुढे केलं. हे ऐकताच माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत जागावाटपाचा अंतिम निर्णय जाहीर होईपर्यंत महायुतीतील प्रत्येक पक्षाला या जागेची मागणी करण्याचा ही जागा मागण्याचा अधिकार असल्याचंही तातडीनं स्पष्ट केलं.


हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटा आणखी तीव्र होणार; कोणत्या भागात सूर्य आग ओकणार? 


एकिकडे दादा भुसे आणि छगन भुजबळ यांची नावं नाशिक मतदारसंघातील जागेमुळं चर्चेत असतानाच दुसरीकडे गिरीश महाजन यांनी नाशिकला भाजपचा बालेकिल्ला सांगत या जागेवर दावा सांगितला. ज्यामुळं आता महायुतीतील पक्षांमध्येच या जागेमुळं धुसफूस सुरु असल्याचं चित्र समोर आलं आहे. सध्याच्या घडीला ही जागा मिळवण्यासाठी आजी- माजी पालकमंत्र्यांमध्ये जुंपली असून, त्यांचे प्रयत्न लपून राहिलेले नाहीत. तेव्हा आता या जागेसंदर्भात नेमका कोणता निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


नाशिकला भाजपकडून बालेकिल्ला म्हणत आता भुजबळांचं वर्चस्व असणाऱ्या या भागावर असणारं त्यांचं वर्चस्व धोक्यात तर येणार नाही हा प्रश्नसुद्धा अनेकांनाच पडताना दिसत आहे. नाशिकमध्ये भाजपचे 3 आमदार आणि 70 नगरसेवक असल्यामुळं इथं भाजपचं संख्याबळ मोठं आहे. शिवसेनेचा शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये यापूर्वीच नाशिकच्या पालकमंत्री पदावरून ठिणगी पडल्याचं पाहायला मिळालं होतं. ज्यामध्ये भुजबळांनी उडी घेतली खरी, पण इथं शिंदे गटानं तडजोड करण्यास नकार दिल्यामुळं राष्ट्रवादी या वादात काहीशी मागे राहिली.