NCP Leader Eknath Shinde: भाजपमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही परतणार का? या चर्चेला उधाण आले आहे. खुद्द एकनाथ खडसे यांनी तसे संकेत दिले आहे. भाजप प्रवेशाबद्दल एकनाख खडसे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना  तूर्तास तरी माझा भाजप प्रवेश नाही, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप प्रवेशाच्या बातम्यांमध्ये काही फार तथ्य नाही. यासंदर्भात काही निर्णय व्हायचा असेल तर तो लगेच होत नाही. त्यासाठी कार्यकर्ते सहकार्यांना विश्वासात घ्यावे लागते, असे खडसे म्हणाले. हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. असा काही विषय असेल तर ज्या पक्षाने आपल्याला आतापर्यंत मदत केलीय त्या पक्षालाही विश्वासात घेणे गरजेचे असल्याचे खडसे म्हणाले. 


भाजप प्रवेशासंदर्भात कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया अजून मी दिलेली नाही. त्यामुळे तूर्तास तरी या प्रश्नांना कुठेतरी विराम द्यावं असं मला वाटतं. जेव्हा मला पक्षात प्रवेश करायचा असेल त्या त्यावेळी मी स्वतःहून तुम्हाला सर्वांना माहिती देईन, असे खडसे म्हणाले.


किरण सामंत यांची सिंधुदुर्ग मतदार संघातून माघार? फेसबुक पोस्टमुळे एकच खळबळ


दिल्लीमध्ये मी माझ्या सुप्रीम कोर्टातील कामासाठी गेलो होतो आणि मला कोर्टाने पुढची तारीख 25 एप्रिल दिली आहे.  पण मी दिल्लीत गेल्यावर माझ्या अनेकांशी भेटीगाठी होतात, चर्चा होतात हे नेहमीचच आहे. मात्र काल हे होऊ शकलेलं नाही अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे.


'अमरावतीत कोणाची लाट नाही...नेते लाचार झालेयत....', बच्चू कडूंनी भाजप, राणांविरोधात थोपाटले दंड