Loksabha Election 2024 : महाराष्ट्राच्या (Maharashtra Political  News ) राजकारणात कैक वर्षांपासून चालत आलेली युतीची समीकरणं मागील दोन वर्षांमध्ये पूर्णपणे बदलली. नव्यानं काही युती जन्मास आल्या, तर काही युतींमध्ये नव्या पक्षांची जोड मिळाली. राज्यातील मोठ्या पक्षांमध्ये बंडखोरी होत एकाच पक्षाचे दोन गटही पडले. यात तडाखा बसलेला पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस. (Sharad Pawar) शरद पवार यांच्या अनुभवाच्या बळावर उभ्या असणाऱ्या राष्ट्रवादीतून अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्यासह पक्षातील मोठ्या नेत्यांनी काढता पाय घेतला. इथंच आरोप प्रत्यारोपांच्या सत्रामध्ये आणखी एक ठिकण पडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवार गटामध्ये गेले राष्ट्रवादीचे नेते आणि शदर पवार गटामध्ये असणारे राष्ट्रवादीचे नेते अशा दोन्ही गटांनी एकमेकांवर सडकून टीका केली. इतकंच नव्हे, तर काही गौप्यस्फोट ही केले. यात आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही उडी घेतली असून, अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. 


सोशल मीडियाच्या माध्यमातून रोहित पवार यांनी सातत्यानं शरद पवार गटाला निशाण्यावर घेणाऱ्या अजित पवार गटावरही यावेळी निशाणा साधला. निमित्त ठरलं ते म्हणजे तटकरे यांचं एक वक्तव्य. 2019 दरम्यान रोहित पवार हडपसर मतदार संघातून भाजपच्या वतीनं उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नांत होते हा गौप्यस्फोट केला आणि राजकीय चर्चांना एकच उधाण आलं. 


इथं रोहित पवार यांच्या नावानं चर्चांना वाव मिळताच तिथं तटकरेंवर निशाणार साधत त्यांनी एक जाहीर सवाल केला आणि आता त्यावर तटकरे काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


तटकरेंचा भाजपप्रवेश? 


'तटकरे साहेब तुमच्यासारखं केंद्रीय यंत्रणांना घाबरून अटकेपासून सुटकेची भीक मागणारा आणि विचारांशी गद्दारी करणारा मी नाही. भाजपमध्ये जायचंच असतं तर आज केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा चुकवण्यासाठी आपल्याप्रमाणे भाजपची आरती गात बसलो असतो. आता ज्याप्रमाणे दिल्लीच्या बाजारात निष्ठा विकून आदरणीय पवार साहेबांची साथ सोडली त्याप्रमाणे अजितदादांचीही साथ सोडून भाजपमध्ये अधिकृत प्रवेश कधी घेताय? तेवढं सांगा!', अशा शब्दांत रोहित पवार यांनी थेट तटकरेंनाच सवाल केला. 



'मी जे बोलतो ते पुराव्यासह बोलतो आणि अजूनही बोलायला भाग पाडलं तर अनेकांना ते परवडणार नाही!', असं म्हणत त्यांनी बऱ्याचजणांना इशाराही दिला. आता त्यांच्या वक्तव्यातील हे 'अनेक' नेमके कोण हासुद्धा एक प्रश्नच!.