योगेश खरे, झी मीडिया, मुंबई : (Loksabha Election 2024) आधीच 42 अंश सेल्सिअस तापमानाने लाहीलाही होणाऱ्या (Jalgaon) जळगाव जिल्ह्यामध्ये आता विद्यमान खासदार उन्मेश पाटील (Unmesh Patil) यांच्या ठाकरे गटातील शिवसेना प्रवेशामुळे वातावरण अधिकच तापले आहे. त्यामुळे उन्मेश पाटील विरुद्ध गिरीश महाजन असा सामना जळगाव मध्ये पाहायला मिळतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उन्मेश पाटील यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे जळगाव लोकसभेमध्ये स्मिता वाघ यांना पराभवाचा फटका बसू शकतो. निवडणुकीची रणनीती तयार करण्यासाठी भाजपने अडगळीत टाकलेल्या पारोळ्यातील माजी खासदार ए टी नाना पाटील यांची आठवण झालीये. भाजप नेते गिरीश महाजन यांनी त्यांच्याशी जळगाव लोकसभा मतदारसंघातील सध्याच्या परिस्थिती विषयी तब्बल दोन तास चर्चा केली. 


महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार हे पारोळ्यातील नगराध्यक्ष असून त्यांचा परिसरामध्ये दांडगा संपर्क आहे तर उन्मेश पाटील या विद्यमान खासदाराची साथ असल्याने महायुतीचे उमेदवार स्मिता वाघ यांना अडचणीत आणू शकतात. त्यात ए टी पाटील हे सुद्धा उमेदवारीसाठी आग्रह असताना त्यांचा विचार करण्यात आला नाही त्यामुळे ते सुद्धा नाराज आहे या परिस्थितीचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला होऊ शकतो. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्मितहास्य करत सर्वेकडे बोट दाखवल्याने भाजपात काहीही आलबेल नसल्याचा समोर येत आहे .


हेसुद्धा वाचा : अजितदादांना सोडून भाजपमध्ये अधिकृत प्रवेश कधी घेताय? रोहित पवारांचा तटकरेंना जाहीर सवाल 


गिरीश महाजन यांनी जळगावमध्ये तळ ठोकत बुथ प्रमुख विभाग प्रमुख आणि सर्व पदाधिकाऱ्यांची दिवसभर खलबते केली. भाजपचे उन्मेश पाटील यांनी ठाकरे शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याने जळगाव जिल्ह्यातील (BJP) भाजप नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. नुकतीच महाविकास आघाडीने करण पवार याला उमेदवारी जाहीर केली. भाजपने विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांची उमेदवारी टाळून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्याने उमेश पाटील चांगलेच चवताळले आहेत. जळगाव मध्ये विपरीत राजकीय परिस्थितीने भाजपचे अधिकच तापमान वाढले आहे. 


जिल्ह्याचे सर्वेसर्वा भाजप नेते गिरीश महाजन यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांची झाडाझडती घेत आता एसी कार दामटा आणि घरोघरी जाऊन प्रचार करण्याचे आवाहन केले. त्यामुळे आता जळगाव जिल्ह्यात लोकसभेच्या मैदानात स्मिता वाघ विरुद्ध करण पवार अशी लढाई होणार असली तरी, यानिमित्ताने भाजपातील राजकीय दादागिरी करणाऱ्या गिरीश महाजन यांच्या भाजपतील वर्चस्वाला आव्हान मिळाले आहे.  त्यामुळे जळगाव लोकसभेची निवडणूक यावेळी चांगलीच राहणार आहे हे नक्की.