Bhawna Gawali: मी इतकी वर्षे काम केली. उमेदवारी न मिळाल्याने मला खंत वाटली. शिवसेनेसाठी माझ्या घराने योगदान दिलंय. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात काम उभ केलं. रात्रीचे 12 वाजेपर्यंत ते काम करतात. त्यामुळे मी महायुतीचे उमेदवार जयश्री पाटलांच यांचे काम करणार आहे. यवतमाळ-वाशिममधून महायुतीकडून जयश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा आपण प्रचार करणार असल्याचे भावना गवळी म्हणाल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लहानपणापासून मला शिवसेनेचं बाळकडू मिळाले. 25 वर्षाच्या कारकिर्दीत मी अनेक पदे उपभोगली असते. पण माझं लक्ष पदावर नव्हत. जनतेने माझ्यावर विश्वास टाकलाय. माझ्यासाठी पक्ष, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान मोदी महत्वाचे आहेत. 


मी इतकी वर्षे काम केलंय. बाकीच्या खासदारांना उमेदवारी मिळाली. याची मला खंत वाटली. माझ्या वडिलांनी शिवसेनेचे काम 1985 पासून सुरु केले. पण मुख्यमंत्र्यांचे हात मजबूत करण्यासाठी मी मैदानात उतरणार असल्याचे त्या म्हणाले. 


पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चारशे पारचा नारा पूर्ण करण्यासाठी मी प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जयश्री पाटलांना विजयी करण्यासाठी आम्ही मेळावे ठेवणार असल्याचे त्या म्हणाल्या. 


आपल्याला कसा प्रचार करायचा, काय जबाबदारी देणार? याबद्दल मुख्यमंत्र्यासोबत चर्चा झाली. उमेदवाराना निवडून आणून देण्याची जबाबदारी मला दिली असल्याचे गवळी म्हणाल्या. 


भाजपने सर्व्हे केला त्यामुळे भावना गवळींची उमेदवारी कापली. पण अचानक आणलेल्या उमेदवाराचा सर्व्हे केला नव्हता. यावर त्यांना विचारण्यात आला. काय झालं याबद्दल मला बोलायच नाही. मी प्रसिद्धीच्या भानगडीत कधी पडली नाही. माझा मताधक्याचा क्रम चढता आहे. सर्व्हे न करता इथपर्यंत मी पोहोचली.


पक्षश्रेष्ठींचा निर्णय हा आमच्यासाठी महत्वाचा असतो. मी कॉलेजला असल्यापासून शिवसेनेचे काम करतेय. माझा मताधिक्याचा क्रम चढता आहे. सर्व्हे कधी मी केलाच नाही. न सर्व्हे करता मी इथपर्यंत पोहोचली आहे. 


माझी पुढची वाटचाल पक्षश्रेष्ठी ठरवतील. एवढी वर्षे भावना गवळींनी किल्ला लढवला. आता काय जबाबदारी द्यायची हे ते ठरवतील, असे ते म्हणाले. 


पुढची वर्षे माझी वाटचाल पक्षश्रेष्ठी ठरवतील. माझी कालपण नाराजी नव्हती. मी संघर्ष करुन पुढे आलीय. मी कुठे कमी पडलीय, याची मला खंत होती, असे त्या म्हणाल्या. 


कार्यकर्ते माझे भाऊ म्हणून जोडले गेले आहेत. मतदार संघात मी त्यांना राख्या पाठवते. महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्यायचे आम्ही ठरवले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.