पुणे : प्रत्येक गोष्टीत आपले मत आक्रमपणे मांडणाऱ्या पुणेकर मतदानाचा हक्क बजावताना कमी पडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. लोकसभा निवडणुकीत निम्म्यापेक्षा कमी पुणेकरांनी मतदान केले आहे. काल अवघ्या ४९. ८४ टक्के पुणेकरांनी मतदानाचा हक्क बजावला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातल्या गल्लीतल्या प्रश्नापासून दिल्लीतल्या सत्तेच्या गादीबाबत हिरहिरीने मत मांडणारे पुणेकर मतदान करण्यात मागे पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. पुणेकरांनी मतदानात एवढा निरुत्साह का दाखवला असा प्रश्न निर्माण झालाय. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत पुण्यात ५४.१० टक्के मतदान झालं होतं.


कमी मतदान होण्याची काही कारणे 


१) निवडणुकीत चुरस नसल्याने आपल्या एका मताने काय फरक पडणार ही वृत्ती
२) राजकीय पक्ष तसेच पुढाऱ्यांची हरवलेली विश्वासार्हता
३) मतदान प्रक्रियेतील गोंधळ 
४) सुट्यांचे दिवस, वाढलेले तापमान
५) वैयक्तिक कार्यक्रम


गेल्या पाच वर्षांत पुण्याचे प्रश्न मार्गी न लावल्याने तसेच समाजमाध्यमावर प्रचार करणारे उमेदवार प्रत्यक्ष प्रचारात कमी पडल्याने पुणेकरांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे मत पुणेकर तरुणांना व्यक्त केले आहे. पुण्यातील कमी झालेल्या मतदाना बाबत खंतही तरुणांनी व्यक्त केली आहे.