Sushma Andhare On Thane Loksabha Seat: ठाण्याच्या जागेवर पंतप्रधान मोदी जरी उभे राहिले तरी ती जागा आम्ही जिंकणारच, असा विश्वास सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलाय.  महायुतीमध्ये शिर्डी लोकसभेची जागा आपल्या वाट्याला येईल, अशी आशा केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले यांना होती. पण त्यांच्या पदरी निराशा पडली. आज सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला आठवले गेले होते. यावेळी आठवलेंची समजूत काढण्यास फडणवीसांना यश आलंय. दरम्यान ठाकरे गटाकडून आता रामदास आठवलेंना ऑफर देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मविआत सांगली आणि मुंबईतील जागांहून आलबेल नाही,महाविकास आघाडीत आलबेल नाही, अशा कंड्या पिकवल्या जात आहेत. माध्यमांना लाईन चालवायची असेल तर महायुतीत आलबेल नाही अशी लाईन चालवावी असे त्या म्हणाल्या.


वसंत मोरे आधी महाविकास आघाडीच्या संपर्कात होते. मग प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला गेले. यावर बोलताना ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मला आनंद-दुख होण्याचा प्रश्न नाही, असे त्या म्हणाल्या. 
तसेच कल्याण लोकसभेचा आमचा उमेदवार संध्याकाळपर्यंत जाहीर करणार असल्याचे त्या म्हणाल्या. 


यावेळी सुषमा अंधारे यांनी रामदास आठवलेंना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात येण्याची खुली ऑफर दिली. त्यांना एकाजागेसाठी धडपड करावी लागतेय. आठवले यांना लहान बहिण म्हणून आमच्या सोबत येण्याची विनंती करते, असे त्या म्हणाल्या.


शिवतारेंनी घेतलेला युटर्न हा त्यांच्या स्क्रिप्ट रायटरने लिहिलेल्या गोष्टींना साजेसा असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला. ज्या अजितदादांनी आढळरावंवर टीका केली त्यांच्याकडेच आढळराव पुन्हा गेले, असेही त्या म्हणाल्या. त्या जागेवर कोल्हे निवडून येतील ही काळा दगडावरची पांढरी रेघ असल्याचे अंधारे म्हणाल्या. 


नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा वाद कोर्टात सुरू असताना भाजपा त्यांना उमेदवारी देते. भाजपा बिथरलेली आहे. न्यायाला विसंगत वागत असल्याची टीका सुषमा अंधारेंनी केली. 


वंचित बहुजन आघाडीला कायम चर्चेला बोलावले गेले..आघाडी तोडण्यासाठी संजय राऊत यांच्या नावाने बिल फाडले गेले.महाविकास आघाडीच्या बैठकीला बोलावल्यानंतर ते कायम तिसऱ्या चौथ्या फळीतल्या लोकांना पाठवत होते, असे त्यांनी यावेळी सांगितले. 


नाशिकची जागा एकनाथ शिंदे यांना न मिळणे हे वाईट आहे. अडसूळ यांनी एवढे प्रयत्न केले पण त्यांना जागा मिळाली नाही.. अर्जुन खोतकर यांची खदखद वेगळीच आहे.