Maharashtra Loksabha Election: देशात 7 टप्प्यात तर महाराष्ट्रात 5 टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबद्दलची माहिती दिली दरम्यान महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी राज्यातील निवडणुकीसंदर्भात महत्वाचे निर्देश दिले आहेत. राज्यातील पहिल्या टप्प्यात 5 मतदार संघात मतदान होणार आहे.यासाठी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. शनिवारी आणि रविवारी उमेदवारी अर्ज भरता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. आतापर्यंत रामटेकमध्ये 1, नागपूरमध्ये 5, भंडारा गोंदियामध्ये 2 आणि  गडचिरोली 2 उमेदवारी अर्ज भरण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. असे असताना आतपर्यंत चंद्रपूर मधून एकही अर्ज आला नसल्याचेही सांगण्यात आले. 


शस्रे जप्तीची कारवाई 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1 लाख 94 हजार नवीन मतदार झाले आहेत. तसेच13 हजार लोकांवर आतापर्यंत सिआरपिसी अंतर्गत आपण कारवाई केलेली आहे. राज्यात 77 हजार 148 शस्रे परवाने दिलेले आहेत. त्यापैकी 45 हजार 755 शस्रे ताब्यात तसेच जप्त करण्याची कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.


भर पगारी सुट्टी 


मतदानाच्या दिवशी खाजगी आणि निमशासकिय कर्मचारी यांना भर पगारी सुट्टी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात 23 कोटी रुपयांची रक्कम जमा केली आहे. 17 लाख दारु, 699 किलो ड्रग्ज जप्त केले आहेत. 3 कोटी 60 लाख मुंबई उपनगरातून जप्त केले आहेत.


सर्व तयारी झाली


ईव्हीएम मशीनची ३०० ची क्षमता असते. त्यापेक्षा जास्त मतदार आले तर मतपत्रिकेवरती  मतदान घेतल जाणार आहे. आमची सर्व तयारी झाली असल्याची माहिती राज्य मुख्य निवडणूक आयोगाने दिली.