Devendra Fadnavis on LokSabha Election Result: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मिळालेल्या अपयशानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जबाबदारी स्विकारली असून, विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तयारीसाठा आपल्याला सरकारमधून मोकळं करावं अशी विनंती केली आहे. यासंबंधी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली असून आपल्या भावना बोलून दाखवल्या आहेत. पण अमित शाह यांनी त्यांना सबुरीचा सल्ला घेण्यास सांगितलं आहे. त्यांनी सध्या आहे तसं काम सुरु राहू दे, आपण नंतर महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट तयार करु असं सांगितलं असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"मला मोकळं करा असं सांगितलं तेव्हा ते निराशेतून बोललो नाही. देवेंद्र फडणवीस हा पळणारा नव्हे तर लढणारा व्यक्ती आहे. चारी बाजूने घेरलयानंतर पुरंदरचा तह करणारे आणि पुन्हा ताकदीने सर्व किल्ले जिंकणारे छत्रपती शिवाजी महाराज आमचे प्रेरणा आहेत. त्यामुळे कोणाला मी निराश झालो असं वाटत असेल तर ते सत्य नाही. माझ्या डोक्यात काही रणनीती आहे. मी अमित शाह यांना भेटून डोक्यात काय आहे हे सांगितलं. त्यांचीही भूमिका तुमच्यापेक्षा फार काही वेगळी नव्हती. त्यांनी सध्या आहे तसं काम सुरु राहू दे, आपण नंतर महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट तयार करु असं सांगितलं. पण कोणत्याही स्थितीत मी शांत बसणारा नव्हतो," असा निर्धार देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.


"कधी कधी पराजय होतो. पण पराजय झाल्यावर एकमेकाच्या डोक्यावर खापर फोडू नका. आपली काही मतं आहेत. काही ठिकाणी समन्वयाचा अभाव आढलला. ते जाहीरपणे बोलण्याची गरज नाही. शेवटी आपली मदत मित्रपक्षाला झाली आहे. आपल्या लोकांनी मित्रपक्षाला मनापासून मदत केली आहे. ही जाहीरपणे उणे-धुणे काढण्याची वेळ नाही. एकमेकाला सोबत घेऊन चालणं महत्वाचं आहे. आता वेगवेगळी विश्लेषणं करु नका,. एका सूरात सर्वांनी बोललं पाहिजे. तक्रारी नेत्यांनी समजून घेतल्या पाहिजेत. या गोष्टी महायुतीसाठी योग्य नाहीत," असा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी दिला. 


"विधानसभेत हे चित्र बदलणं कठीण नाही. खोट्या नरेटिव्हचा काळ आता संपला आहे. विधानसभेसाठी फक्त 3 ते 3.5 टक्के मतं बदलायची आहेत. पुन्हा एकदा आपण मैदान जिंकू याचा मला विश्वास आहे. मी निवडणूक संपल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो आहेत. जोपर्यंत महायुतीचा झेंडा फडकणार नाही, तोप्रयंत थांबणार नाही," असा निर्धार देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे.