Mahayuti seat allocation: लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीमधून एकत्र निवडणुका लढतील. कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यात शिवसेनेनं 18 लोकसभा जागांची मागणी केली होती. पण जागेचा तिढा काही सुटण्याचे नाव घेत नाहीय. त्यात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीला गेले आहेत. तिघात चौथा आल्यास महायुती मजबूत होणार की तिढा अजून वाढणार? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना कोट्यातूनच मनसेला जागा दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाणे, सिंधुदुर्ग, नाशिक, संभाजीनगरच्या जागेवरून शिवसेना-भाजपमध्ये जागांसाठी घासाघीस सुरु आहे. वाशिम, रामटेक, शिर्डी मतदारसंघात शिवसेनेकडून उमेदवारांची चाचपणी सुरु आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना एकनाथ शिंदे गटाने 18 जागांची मागणी केली आहे. त्यातील 16 जागांवर शिंदे गट ठाम आहे. सध्या मनसे महायुतीत येण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मनसे महायुतीत सहभागी झाल्यास त्यांना 2 लोकसभा जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे. त्यांना कोणाच्या वाट्यातून जागा करुन दिली जाणार? जागावाटपाचा तिढा कोणती दिशा घेतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


एकनाथ शिंदेंचे कोण आहेत माजी खासदार?  


1. श्रीकांत शिंदे - कल्याण
2. राहुल शेवाळे - दक्षिण मध्य मुंबई
3. हेमंत पाटील - हिंगोली
4. प्रतापराव जाधव - बुलडाणा
5. कृपाल तुमाणे - रामटेक
6. भावना गवळी - यवतमाळ-वाशिम
7. श्रीरंग बारणे - मावळ
8. संजय मंडलिक - कोल्हापूर
9. धैर्यशील माने - हातकणंगले
10. सदाशिव लोखंडे - शिर्डी
11. हेमंत गोडसे - नाशिक
12. राजेंद्र गावित - पालघर
13. गजानन कीर्तीकर - वायव्य मुंबई