LokSabha Election: लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या प्रचाराचा धुराळा उडत आहे. प्रचारसभांमधून नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. पण यादरम्यान चिखलफेकही केल्या जात आहेत. यादरम्यान संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवनीत राणा (Navneet Rana) यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. बळवंत वानखेडे यांच्याविरोधात नाचीची नाही, तर देशाची लढाई आहे असं संजय राऊत म्हणाले आहेत. तसंच तुम्हाला बाई खुणावेल, ती पडद्यावरची नटी आहे असंही म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"ही लढाई देशाची आहे. ही लढाई बळवंत वानखेडे विरोधात नाची अशी नाही. आमची लढाई बबली सोबत नाही. ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र, मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी अशी आहे," अशी टीका संजय राऊत यांनी नाव न घेता नवनीत राणांवर केली आहे. 


पुढे ते म्हणाले, "तुम्हाला बाई खुणावेल ती पडद्यावरची नटी आहे. बाई तुम्हाला प्रेमाने बोलावेल पण तुम्ही मोहाला बळी पडू नका. आपण सावध राहिलं पाहिजे. डोळा मारला की जायचं नाही. आता आपला विचार बळवंत वानखेडे हाच आहे". ज्या बाईने मातोश्रीचा अवमान केला आणि मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न केला तिचा पराभव करणं हे आमचं प्रथम काम आहे असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. 


"पक्ष प्रथमच फुटलेला नाही, बाळासाहेब यांच्या हयातीत अनेकजण त्यांना सोडून गेले. आमच्या पाठी शिवसेनेचे चार अक्षर नसते तर आम्ही कुठे असतो.  शिवसेना प्रमुखानंतर महत्वाचं पद शिवसेनेत कोणतं असेल तर ते शिवसैनिक आहे. माझ्या पाठीत इतक्या लोकांनी खंजीर खुपसले आता पाठीत खंजीर खुपसायला जागा राहिली नाही असं आम्हाला बाळासाहेब सांगायचे. जेव्हा महत्वाचे ऑपरेशन करायचे तेव्हा बाळासाहेब रणरागिणी रस्त्यावर उतरवायच. आम्ही इथे महाराष्ट्र म्हणून आलेलो आहे आणि महाराष्ट्र कोणाच्या बापाला भीती नाही," असा इशाराही संजय राऊतांनी दिला आहे. 


"मुंबई महाराष्ट्रात राहिली पाहिजे यासाठी काँग्रेसने आम्हाला मदत केली. आता गुजरातचे ढवळे पवळे आले त्यांना आम्ही घाबरत नाही. तुमची 56 इंचाची छाती कोणी मोजली? गुजरात कधी देशासाठी लढला का हे सांगा? चीन आपल्या देशात घुसला तरी मोदी तोंड का उघडत नाहीत. 56 इंचाची छातीवला मणिपूरला जाऊ शकला नाही. ही 56 इंचाची छाती आहे काय़
या पोकळ छातीने महाराष्ट्राशी लढाई करू नये," अशी टीका संजय राऊतांनी केली. 


राज्याच्या मुख्यमंत्र्याला आठ आठ दिवस वेटिंगवर ठेवलं जातं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. मुख्यमंत्री एवढा लाचार आणि लोचट आहे की तो वारंवार दिल्लीला जातो अशी टीका त्यांनी केली. भाजपवाल्यांनी महाराष्ट्राला नामर्द केलं. भाजपने महाराष्ट्राला षंड केलं असंही ते म्हणाले.