Cannes मध्ये नॅन्सीचीच हवा! भारतीय फॅशन इन्फ्लुएन्सरनं मार्केटमधून घेतलेल्या साडीला दिलं नवं रुप, Photo Viral

Nancy Tyagi : भारतातूनही बठऱ्याच सेलिब्रिटींनी कान्स चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली होती. पण, सोशल मीडिया गाजवणारा चेहरा मात्र एकाच तरुणीचा होता. ती कोण? तुम्हाला माहितीये?   

May 21, 2024, 14:49 PM IST

Nancy Tyagi again turns heads with self-made hand embroidery saree : 77 व्या कान्स चित्रपट महोत्सवामध्ये यंदा नजर रोखणारे अनेक चेहरे पाहायला मिळाले.

1/9

फॅशन इन्फ्लुएन्सर

Nancy Tyagi again turns heads with self-made hand embroidery saree in second Cannes appearance

Nancy Tyagi again turns heads with self-made hand embroidery saree : भारतीय फॅशन इन्फ्लुएन्सर नॅन्सी त्यागी हिनं यंदाच्या कान्स चित्रपट महोत्सवात सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकवला.   

2/9

फॅशन इंडस्ट्री

Nancy Tyagi again turns heads with self-made hand embroidery saree in second Cannes appearance

एकिकडे पहिल्या रेड कार्पेट अपिअरन्सच्या निमित्तानं नॅन्सी एखाद्या बाहुलीसारखी घेरदार फ्रॉक घालून आली आणि तिनं डिझाईन केलेल्या या लूकला संपूर्ण फॅशन इंडस्ट्रीनं उचलून धरलं.   

3/9

नॅन्सीच्या या लूकची चर्चा

Nancy Tyagi again turns heads with self-made hand embroidery saree in second Cannes appearance

तिथं नॅन्सीच्या या लूकची आणि तिच्या खरेपणाची चर्चा थांबत नाही तोच तिच्या आणखी एका लूकचे फोटो प्रटंड व्हायरल झाले. यावेळी नॅन्सीनं कान्समध्ये स्थानिक मार्केटमधूनच खरेदी केलेली एक साडी फ्लाँट केली. पण, तीसुद्धा एका वेगळ्या अंदाजात. 

4/9

अपडेट

Nancy Tyagi again turns heads with self-made hand embroidery saree in second Cannes appearance

नॅन्सीनंच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्याबाबतचे अपडेट दिले. जिथं तिनं स्वत:च्या हातानं तयार केलेली एक एम्ब्रॉयडरी असणारी साडी कान्सच्या लूकसाठी निवडली होती.   

5/9

नॅन्सीची वाहवा

Nancy Tyagi again turns heads with self-made hand embroidery saree in second Cannes appearance

कोणाएका अग्रगण्य फॅशन डिझायनरलाही लाजवेल असाच नॅन्सीचा हा लूक होता. त्या लूकला साजेसा मेकअप आणि हेअरस्टाईल करत तिनं हा लूक अधिक उठावदार केला होता.   

6/9

सेल्फ मेड

Nancy Tyagi again turns heads with self-made hand embroidery saree in second Cannes appearance

नॅन्सीची ही साडी आणि त्याची संपूर्ण बांधणी अतिशय वेगळ्या धाटणीची असल्यामुळं तिच्या या लूकची बरीट वाहवा झाल्याचं पाहायला मिळालं. 

7/9

कान्स

Nancy Tyagi again turns heads with self-made hand embroidery saree in second Cannes appearance

कान्सच्या या लूकसाठी नेमकी कशी तयारी केली यासंदर्भातील व्हिडीओ तिनं सोशल मीडियावर शेअर करताच अनेकांनीच नॅन्सीचं कौतुक केलं. 

8/9

सेलिब्रिटींना भुरळ

Nancy Tyagi again turns heads with self-made hand embroidery saree in second Cannes appearance

फक्त नेटकरीच नव्हे, तर सेलिब्रिटी मंडळींनीही नॅन्सीच्या आत्मविश्वाला दाद दिली असून, तिच्या कलात्कमकतेचं कौतुक केल्याचं यावेळी पाहायला मिळालं.   

9/9

कसा वाटला हा लूक?

Nancy Tyagi again turns heads with self-made hand embroidery saree in second Cannes appearance

नॅन्सीनं आतापर्यंत सोशल मीडियावर बरीच प्रसिद्धी मिळवली आहे. ती एक इन्फ्लुएन्सर म्हणून नावारुपास आली असून, सेलिब्रिटी लूक रिक्रेएट करणं अर्थात पुन्हा तसेच लूक तयार करणं किंवा सेलिब्रिटींशी मिळताजुळता लूक करणं, त्यासाठीची तयारी आणि पर्यायी सामानाचा वापर अशा गोष्टींचे व्हिडीओ आणि रील नॅन्सी शेअर करत असते.