मुख्यमंत्री कधी होणार? कार्यकर्त्यांच्या मनातील प्रश्नाला खुद्द अजित पवारांनीच दिलं उत्तर
Ajit Pawar On Maharashtra CM Post: अजित दादा मुख्यमंत्री कधी होणार हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडलेला असतो. याचे उत्तर खुद्द अजित पवारांनी दिले आहे.
Ajit Pawar On Maharashtra CM Post: अजित पवार हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणाच्या वर्तुळात नेहमीच चर्चेत राहिले आहे. ते आपल्या बेधडक कामे आणि वक्तव्यासाठी नेहमीच चर्चेत असतात. आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशी लढत पाहायला मिळणार आहे. अजित पवारांनी अनेकदा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पद संभाळले आहे. अजित पवारांनी एकदा तरी राज्याचे मुख्यमंत्री व्हावे अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. अनेकदा कार्यकर्त्यांनी उघडपणे ही इच्छा बोलूनदेखील दाखवली. अजित दादा मुख्यमंत्री कधी होणार? हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडलेला असतो. त्याला खुद्द अजित पवारांनीच उत्तर दिले आहे. 'झी 24 तास'चा विशेष कार्यक्रम 'टू द पॉइंट' मध्ये ते बोलत होते. यावेळी झी 24 तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली.
सुप्रिया सुळे दिल्लीत होत्या. अजित पवार राज्यात पक्ष संभाळत होते. सर्वकाही सुरळीत चालले असताना अचानक वेगळा निर्णय का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी नव्या पिढीला संधी मिळायला हवी. आता मी 64 वर्षाचा आहे, ते 74 वर्षांचे आहेत. आम्हीपण किती काळ थांबायचं? आम्हापण आमचं पुढंचं भवितव्य आहे. प्रत्येक वेळेस मी म्हणेल ती पूर्व दिशा असं म्हणून कसं चालेल. राजीनामा दिला आणि परत घेतला. कोण त्यांना विचारणार? असे म्हणत त्यांनी शरद पवारांवर टीका केली.
अनेकदा उपमुख्यमंत्री पद संभाळले पण अजित दादा मुख्यमंत्री कधी होणार? असा प्रश्न कार्यकर्त्यांना नेहमी पडलेला असतो. याचे उत्तर अजित पवारांनी दिले आहे. ज्या वेळेस अजित पवारांना 145 हा मॅजिक फिगर गाठता येईल. त्यावेळी मुख्यमंत्री होईल. शिवसेना-भाजपचे स्थिर सरकार होते. मग ते कशाला मुख्यमंत्रीपद देतील? ते म्हणतील आमचं व्यवस्थित चाललंय, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे जेव्हा मला स्पष्ट बहुमत मिळेल तेव्हा मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईनं, असे अजित पवार म्हणाले.
सुनेत्रा पवारांना उमेदवारीसाठी भाजपचा आग्रह? अजित पवारांनी सांगितलं खरं कारण
माझे पंतप्रधान मोदी यांच्यासोबत आधीपासूनच चांगले संबंध राहिले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चांगली मैत्री आहे. आता आम्हाला सोबत एकत्र काम करण्याची संधी मिळाली आहे, असे अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. याची सुरुवात कोणी केली? राज्यातून यासाठी पुढाकार घेण्यात आला की दिल्लीतून यासाठी विचारणा झाली? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर बोलताना टाळी एका हाताने वाजत नाही, असे उत्तर त्यांनी दिले.
सुनेत्रा पवारांना उमेदवारीसाठी भाजपचा आग्रह?
आम्ही प्रमुख नेत्यांनी चर्चा करुन उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. यात भाजपचा हात नव्हता. आम्हाला बदनाम करण्यासाठी चर्चा सुरु असतात. सुनेत्रा पवार अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करतात. पर्यावरण क्षेत्रात त्यांचे चांगले काम आहे. टेक्सटाईल पार्कमध्ये 5-6 हजार महिलांना त्यांनी रोजगार दिलाय. आम्ही राजकरण करत असताना बारामतीचा प्रचार त्या संभाळायच्या.
अजित पवार कुटुंबात एकटे पडले?
1962 ला वसंसतदादा पवार यांना तिकीट मिळाले. त्यावेळीदेखील विरोध झाला. पवार कुटुंबासाठी हे काही नवीन नाही. 1978 लादेखील असा प्रकार झाला. यावर एक पुस्तक लिहिता येईल. नव्या पिढीला या गोष्टी माहिती नाहीत. मी एकटा पडलो नाही. बारामती माझं कुटुंब आहे. त्या पद्धतीने मी पुढे चाललोय.