हिरवा निसर्ग, फुलांचा बहर, धुकं, पाऊस आणि थंडी! लोणावळ्याचं मिनी कास पठार... पर्यटकांची तुफान गर्दी
LONAVALA-Karvi Flower : लोणावळ्यात सध्या पर्यटकांची तुफान गर्दी झाली आहे. लोणावळ्याचे निसर्ग सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालत आहे.
LONAVALA-Karvi Flower Festival : लोणावळामध्ये सध्या साताऱ्याच्या कास पठारचा फिल मिळत आहे. लोणावळ्याचं मिनी कास पठार पाहण्यासाठी पर्यटकांची तुफान गर्दी होत आहे. हिरवा निसर्ग, फुलांचा बहर, धुकं आणि थंडी अशा वातावारणात फिरताना पर्यटक हरखून जात आहे. येथील निसर्गसौंदर्य पर्यटकांना आकर्षित करत आहे.
मावळ तालुक्याला निसर्गाने भरभरून दिल आहे. सहयाद्रीच्या पर्वतरांगेत वसलेल्या मावळ तालुक्यात पावसाळा सुरू झाला की निसर्गाची किमया पहायला मिळते. येथील निसर्ग पावसाळ्यापासून बहरायला लागतो. मात्र, आता परतीचा पाऊस सुरू झाला आणि पुन्हा एकदा मावळचा निसर्ग बहरु लागला आहे. लोणावळ्यातील टायगर पॉईंट पासून अवघ्या काही अंतरावर मिनी कास पठार तयार झाले आहे.
सुंदर फोटो पाहण्यासाठी क्लिक करा... लोणावळामध्ये साताऱ्याच्या कास पठारचा फिल! 7 वर्षातून एकदा फुलणाऱ्या कारवी फुलांचा बहर
तब्बल सात ते आठ वर्षांनंतर लोणावळ्यात कारवीच्या फुलांचा बहर आला आहे. संपूर्ण टेकडी कारवीच्या फुलांनी फुलून गेल्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी याठिकाणी दिसून येत आहे. धुक्याची चादर आणि कारवीच्या फुलांनी फुललेला परिसर अशी निसर्गाची पर्वणीच जणू पर्यटकांना मिळाली आहे.
लोणावळ्यात धुक्याची चादर
पर्यटकांचे आकर्षक असणारे लोणावळा परतीच्या पावसाने धुक्यात हरवला. परतीचा पाऊस लोणावळ्यात अधून मधून पडत असल्याने संपुर्ण लोणावळा आज धुक्यात हरवला होता. पर्यटक लोणावळ्यात वर्षाविहार करण्यासाठी पसंती देतात. मात्र परतीच्या पावसाने पुन्हा एकदा लोणावळ्यात आल्हाददायक वातावरण तयार झाले आहे. संपूर्ण लोणावळा धुक्यात हरवल्याने वाहनचालकांना मात्र वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. लोणावळ्यात आल्हाददायक वातावरण अनुभवयाला मिळत आहेत.
पर्यटकांना भरळ घालतयं चिखलदरा
अमरावती जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या चिखलदरा येथे सध्या पावसाने उघडीप घेतली आहे. त्यामुळे संपूर्ण चिखलदऱ्यासह मेळघाटात आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्वत्र धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटक चिखलदरा येथे हजेरी लावत असून पर्यटनस्थळ चिखलदरा येथे मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. चिखलदऱ्यात दिवसभर धुकच धूक पाहायला मिळत असून पर्यटकांना हे धूक भुरळ घालत असल्याचे पाहायला मिळत आहे. पावसामुळे सर्वत्र हिरवळ पसरली असून सर्व दऱ्या खोऱ्यातून पाणी वाहत असल्याचे दिसून येत आहे.