औरंगाबाद : मैत्रिणीला खोलीवर बोलावून डोके ठेचून, गळफास देत तिची हत्या केली. नंतर त्या तरुणानेही गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेतील पिसादेवी भागात उघडकीस आली आहे. रेणुका ढेपे असे 19 वर्षीय मृत तरुणीचे नाव आहे. तर शंकर विष्णू हागावणे (वय 25) असे हत्येनंतर स्वतः आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

18 एप्रिल रोजी दुपारी शंकरने रेणुकाला त्याच्या नारेगाव भागातील भाड्याने घेतलेल्या खोलीत भेटायला बोलावले होते. दरम्यान रेणुकाच्या डोक्यात धारधार शस्त्राने घाव घातला. त्या नंतर गळफास देत निर्घृण हत्या केली. 


हत्येनंतर शंकराने मोबाईल बंद करून पोबारा केला होता. तेंव्हा पासून तो फरार होता. मात्र शुक्रवारी सकाळी पिसादेवी भागातील एका शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत शंकरचा मृतदेह आढळून आला.