Lucknow Heart Attack News: लखनौ येथे एका बँकेत काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. महिला दुपारचा डबा खाण्यासाठी ऑफिसमध्ये बसलेला असताना अचानक तिची खुर्चीवरुन ती खाली कोसळली. त्यानंतरही ती बेशुद्ध होती. महिला कर्मचाऱ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी लखनौ येथील गोमतीनगर येथील ब्रँचमध्ये काम करणारी महिला अधिकारी लंच करण्यासाठी ऑफिसातील खुर्चीवर बसलीच होती की अचानक खुर्चीवरुन खाली कोसळली. महिलेचे नाव सदफ फातिमा असं असून तिचे वय 45 वर्ष असल्याचे सांगण्यात येत आहे. लखनौयेथील वजीरगंज परिसरात येथील रहिवासी आहे. महिला अचानक बेशुद्ध पडल्यामुळं  तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मात्र, महिला अधिकाऱ्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे. 


समोर आलेल्या माहितीनुसार, फातिमा यांच्याजवळ टीम मॅनेजरचं पद होतं. मंगळवारी सकाळी ऑफिसमध्ये आल्यानंतर ती ट्रॅनिंग सेक्टरमध्ये गेली. त्यानंतर दुपारी जवळपास एक वाजेपर्यंत ती तिच्या सहकाऱ्यांसोबत लंचसाठी गेले होती. मात्र तिथेच ती खुर्चीवरुन खाली कोसळली. 


फातिमा यांच्या बहिणीच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार, तिला ब्लड प्रेशरचा त्रास होता. तीन दिवसांपूर्वीच तिची तब्येत बिघडली होती. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर घरात थोडा आराम करुन ती पुन्हा ऑफिसमध्ये रुजू झाली होती. त्यांनी पुढं म्हटलं की, ते सगळेजण काश्मीरला जाण्याचा प्लान करत होते तेव्हाच ही घटना घडली. 


लखनौच्या या घटनेवरुन सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. अखिलेश यांनी लखनौमध्ये कामासाठी दबाव आणि तणाव या कारणामुळं एचडीएफसीच्या एखा महिला अधिकाऱ्याची ऑफिसमध्येच खुर्चीवरुन कोसळून मृत्यू झाल्याची बातमी निंदनीय आहे.  यासंदर्भात कंपनी आणि सरकारी विभागांना ही गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. अशा आकस्मित निधनामुळं वर्क कल्चरवर प्रश्न उपस्थित होत आहेत.