कोकण रेल्वे मार्गावर आणखी एक नवी गाडी, पश्चिम महाराष्ट्राला जोडणार
कोकण रेल्वे मार्गावर आधी मनमाड - सावंतवाडी नवी रेल्वे सुरु करण्यात आल्यानंतर आता आणखी एक गाडी सुरु करण्यात आलेय. या नव्यागाडीमुळे पश्चिम महाराष्ट्र कोकण रेल्वेने जोडला गेलाय.
मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर आधी उत्तर महाराष्ट्र जोडण्यासाठी मनमाड (नाशिक) - सावंतवाडी नवी रेल्वे सुरु करण्यात आल्यानंतर आता आणखी एक गाडी सुरु करण्यात आलेय. या नव्यागाडीमुळे पश्चिम महाराष्ट्र कोकण रेल्वेने जोडला गेलाय. ही गाडी आठवड्यातून एकदा धावणार आहे.
००१२८ मडगांव - कोल्हापूर अशी नवी विशेष गाडी सुरु करण्यात आलेय. ही गाडी गुरुवारी धावेल. आठवड्यातून ही एकदाच गाडी धावणार आहे. या गाडीमुळे कोकण रेल्वे मार्गावर नवी विशेष गाडी सुरु झालेय. याआधी मनमाड - सावंतवाडी अशी विशेष गाडी आठवड्यातून शनिवारी या दिवशी धावणार आहे.
मडगांव - छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर अशी विशेष गाडी सुरु करण्यात आलेय. ही गाडी मडगाववरुन २१ नोव्हेंबरला २०१७ पासून संध्याकाळी ७.४० वाजता सुटेल ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कोल्हापूरला ५.४५ वाजता पोहोचेल.
या गाडीला करमाळी, थिविंम, सावंतावाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल, कर्जत, लोणावळा, पुणे, सातारा आणि मिरज असे थांबे असणार आहेत.
ही गाडी १५डब्ब्यांची असून १२ स्लिपर असून यात पॅन्ट्रीकार असणार असून एसएलआरचे (पार्सल डब्बा) २ डब्बे असणार आहे.