Madha LokSabha Constituency: महाविकास आघाडीने पाडव्याच्या मुहूर्तावर जागावाटापाची घोषणा केली. उद्धव ठाकरे गट 21 जागा लढवणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. त्याचखालोखाल काँग्रेस 17 जागा आणि शरद पवार गट 10 जागा लढवणार असं निश्चित झाल्याची घोषणा करण्यात आली. यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार गटाने भारतीय जनता पार्टीला धक्का देण्याचं जवळपास निश्चित केलं आहे. आपल्या न घोषित केलेल्या एकमेव जागेवर आयात उमेदवार उभा करण्याची तयारी शरद पवार गटाने केली आहे. भाजपाचे सदस्य असलेल्या मोहिते पाटील घराण्यातून बंडखोरी जवळपास निश्चित मानली जात आहे. याच बंडखोर सदस्याला उमेदवारी देण्याचा शरद पवार गटाचा मानस आहे.


फडणवीसांच्या प्रयत्नांना अपयश


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये धैर्यशील मोहिते-पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. आकलुजमधील विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुलात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी मोहिते-पाटील कुटुंबातून कोण कोण उपस्थित राहणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलं आहे. धैर्यशील मोहिते पाटलांचे चुलत बंधू रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे विधानपरिषदेचे आमदार असून देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील घराण्यातील ही बंडखोरी टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र त्यामध्ये फडणवीसांना फारसं यश आल्याचं दिसत नाही. धैर्यशील पाटील यांनी बंडखोरी करायचं ठरवलंय अशी माहिती समोर आली आहे. असं असताना महायुतीत असलेले फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांचे बंधू काय भूमिका घेता हे देखील महत्वाचं ठरणार आहे. 13 एप्रिल रोजी हा पक्षप्रवेश शरद पवारांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. त्यामुळे शरद पवारांची ही राजकीय गुगली फडणवीस टोलवून लावतात की क्लिन बोल्ड होतात हे येणाऱ्या निवडणुकीच्या निकालातच कळेल.


साताऱ्याचा उमेदवार जाहीर


शशिकांत शिंदेंना साताऱ्यामधून राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केली आहे. साताऱ्यातील संभाव्य उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी निवडणुक लढवण्यास नकार दिल्यानंतर सातारा मतदारसंघातून कोण लढणार हा प्रश्न चांगलाच चर्चेत होता. अखेर यावरील सस्पेन्स आज संपला. शशिकांत शिंदेंचा जन्म 19 ऑक्टोबर 1963 रोजी झाला आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळाचे जलसंपदा मंत्री म्हणून काम केले आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगावमध्ये त्यांचा चांगलाच राजकीय दबदबा आहे. ते 2009-2014 साठी कोरेगावमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले होते. 2014 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली आणि निवडून आले. सध्या ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत.


नक्की वाचा >> नव्या भूमिकेनंतर राज ठाकरेंना धक्का! मोठा नेता पक्ष सोडत म्हणाला, 'भाजपाबरोबर जाण्याने मराठी..'


रावेरमधून मराठा कार्ड


राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट निवडणूक लढवत असलेल्या रावेर मतदारसंघातून श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. श्रीराम पाटील हे जळगाव जिल्ह्यातील उद्योजक आहेत. मागील अनेक वर्षांपासून जे सामाजिक कार्यात सक्रीय आहेत. श्रीराम पाटील यांच्या माध्यमातून शरद पवार गटाने मराठा कार्ड खेळल्याची चर्चा आहे. रावेर मतदारसंघामध्ये मराठा समाजाच्या मतदारांचं वर्चस्व आहे. श्री साईराम प्लास्टिक अँड इरिगेशन कंपनीचे श्रीराम पाटील मालक असून सिका या इलेक्ट्रिक टू व्हीलर उत्पादक कंपनीचेही ते मालक आहेत. रावेर मतदारसंघामध्ये महायुतीकडून एकनाथ खडसेंच्या सुनबाई रक्षा खडसेंना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता श्रीराम पाटील विरुद्ध रक्षा खडसे अशी थेट लढत होणार आहे.


राष्ट्रवादीचे उमेदवार कोण?


वर्धा - अमर काळे
दिंडोरी- भास्करराव भगरे
शिरुर- डॉ. अमोल कोल्हे
बारामती - सुप्रिया सुळे
अहमदनगर - निलेश लंके 


नक्की वाचा >> 'राज ठाकरेंना दोघांची विकेट काढायचीये?' आव्हाडांना वेगळीच शंका; म्हणाले, 'एकमेकांना शिव्या..'


बीड- बजरंग सोनावणे
भिवंडी - सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे
सातारा - शशिकांत शिंदे
रावेर - श्रीराम पाटील