Maglev Train in China: मुंबई ते पुणे 20 मिनिटांत, मुंबई ते गोवा एका तासात आणि मुंबई ते नागपूर फक्त दीड तासात पोहचता येईल असं तुम्हाला कुणाला सांगितले तर विश्वास बसणार नाही. हे सगळं शक्य होईल जेव्हा चीनमध्ये धावणारी ट्रेन भारतात येईल. ही ट्रेन विमानापेक्षा सुपरफास्ट आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनमध्ये असलेल्या या जगातली वेगवान ट्रेनचे नाव मॅग्लेव आहे. या ट्रेनचा वेग आहे ताशी तब्बल 600 किलोमीटर आहे. चीनच्या चाइना रेल्वे रोलिंग स्टॉक कोर्पोरेशननं ही ट्रेन तयार केलीय.  या ट्रेनच्या चाचणी यशस्वी झाली आहे..  चीनमध्ये पेंचिंग आणि शंघाई दरम्यान ही ट्रेन धावली. 


अतिशय वेग असल्यानं ही ट्रेन जमिनीपासून थोडी उंचावरुच धावते.  जमिनीपासून 10 सेंटीमीटरवरुन ही ट्रेन धावते.  यापेक्षाही वेगवान ट्रेन जापाननं 2015 मध्ये सुरू केल्याचा दावा करण्यात आलाय. त्या ट्रेनचा वेग 603 प्रति तास इतका होता. चीनमधील किंगदाओमध्ये या ट्रेनची निर्मिती झाली आहे. इलेक्ट्रो-मॅगनिक फोर्स म्हणजेच विद्युत चुंबकीय बलाचा वापर करून ही ट्रेन धावते. मॅग्लेव ट्रेन ही रेल्वे रूळांवर न धावता हवेतच धावते.  या ट्रेनचा वेग 600 किमी प्रतितास आहे. वेगाने धावणाऱ्या या ट्रेनला बीजिंगपासून शांघाईपर्यंत पोहोचण्यासाठी फक्त 2.5 तास लागतात. या दोन्ही शहरातील अंतर आक हजार किमी आहे.