Maharashtra 2024 Zeenia AI Exit Poll Marathwada : विदर्भात महायुती मुसंडी मारणार आहे, मात्र मराठवाड्यात महायुतीला फटका बसणार आहे. असा अंदाज झी न्यूजची आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँकर Zeenia वर्तविला आहे. मराठवाड्यात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळणार, असा अंदाज Zeenia AI Exit Poll व्यक्त केलाय. मराठवाड्यात मविआला 24 ते 29 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महायुतीला 16 ते 21 जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आलाय. मराठा आरक्षण आंदोलनाचा महायुतीला फटका बसल्याच बोला जातोय, या अंदाज व्यक्त करण्यात आलाय. 


विधानसभा निवडणूक Zeenia AI Exit Poll मराठवाडा अंदाज 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठवाडा 46 
महायुती  16-21
मविआ    24-29
इतर        00-02


गेल्या विधानसभा निवडणुकीत 288 जागांसाठी लढवल्या गेलेल्या एकट्या मराठवाड्याकडून सर्वाधिक 46 आमदार निवडले गेले होते. यामध्ये काही वादग्रस्त उमेदवारांपासून प्रतिष्ठित चेहऱ्यांची वर्णी पाहायला मिळाली होती. मराठवाड्यामध्ये यंदा काही अंशी मोठे बदल झाल्याचं पाहायला मिळालं. गेल्या वेळी महायुतीला मराठवाड्यात चांगलं यश मिळाल्याचं पाहिला मिळालं मनोज जरांगे मराठा आंदोलनाचा फटका विधानसभा 2024 मध्ये बसणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. पण यंदा 'शरद पवार फॅक्टर'ची चांगलीच जादू चालली असं म्हणावं लागणार का हे 23 नोव्हेंबरला कळणार आहे. महाराष्ट्राचा एक्झिट पोल हा एक अंदाज आहे, शनिवारी 23 नोव्हेंबरला मराठवाड्यात काय निकाल लागतो हे पाहणे औत्सुकाचे ठरणार आहे. 


 


हेसुद्धा वाचा - Maharashtra Exit Poll : विदर्भात महायुतीची मुसंडी! लोकसभेतील पिछेहाटीनंतर आता किती जागा मिळणार?


 


कशाप्रकारे तयार करण्यात आला AI Exit Poll


2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने झी न्यूजने पहिल्यांदाच Artificial Intelligence वापर करून एक्झिट पोल जारी केला होता. आणि Zee News AI Anchor Zeenia ने दिलेल्या एक्झिट पोलसमोर मोठे दिग्गज फेल ठरले होते. 
यंदाचा एक्झिट पोल हा लोकांच्या समाजमाध्यमांवरच्य प्रतिक्रियांच्या आधारे तयार केला गेला आहे. 
समाजमाध्यमांवरच्या 15 लाखांहून अधिक प्रतिक्रियांचं विश्लेषण केलं आणि तोच सँपल साईज आहे. 
महाराष्ट्रातून जवळपास 10 लाख प्रतिक्रियांचं विश्लेषण केलं. 
इतका मोठा सँपल साइज एक्झिट पोलमध्ये कुणाचाच नसेल.


(महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागतील. तत्पूर्वी ZEE २४ तास ने आपल्या प्रेक्षकांसाठी AI एक्झिट पोल आणला आहे. या एक्झिट पोलमध्ये आम्ही आर्टिफीशिअल इंटेलिजेन्सचा वापर केलाय. डेटा कलेक्शन आणि डेटा प्रोसेसिंगमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय. उल्लेखनीय बाब म्हणजे, झी २४ तास तुम्हाला जे आकडे दाखवत आहे, ते सर्व्हे एजंसीचे आहेत. हे आकडे विधानसभा निवडणुकीचे निकाल नसून केवळ एक्झिट पोलची आकडेवारी आहे. एक्झिट पोलचे आकडे आणि निकाल यात फरक असू शकतो.)