अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : राज्यभरात भटक्या कुत्र्यांचा  (Stray Dog) उच्छाद कमी होताना दिसत नाहीए. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत किंवा जखमी झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पण यानंतरही भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला जात नाहीए. भटक्या कुत्र्यांची काळजी घेण्याची जबाबदारी महापालिकांची (Municipal) असते. पण आजही या घटनांवर भटक्या कुत्र्यांना आवर घालण्यात महापालिकांना यश आलेलं नाही. श्वानांची नसबंदी हा तर केवळ फार्सच ठरत आहे. अमरावतीत कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय घडलं नेमकं
अमरावती शहरातील जलील कॉलनी इथं एक सहा वर्षीय मुलगी खेळत असतांना अचानक भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. यावेळी त्या मुलीने स्वतःला वाचवण्यासाठी एका चारचाकी वाहनाच्या मागे लपन्याचा प्रयत्न केला. पण कुत्र्यांनी तिला ओढत नेत तिच्या कमरेवर जबर चावा घेतला. यावेळी आजूबाजूला राहणाऱे काही लोकं तातडीने आले आणि या मुलीचा जीव वाचवला. सध्या या जखमी मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. शहरात मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे तरीही महानगरपालिका कुंभकर्णच्या झोपेत आहे अशी टिका होत आहे.


हैदराबादमधला तो भीषण प्रसंग
काही महिन्यांपूर्वी हैदराबादमध्ये एका पाच वर्षांच्या मुलाचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. पाच वर्षांच्या या मुलाचे वडिल सिक्युरीटी गार्ड म्हणून काम करत होते. ते आपल्या मुलाला कामच्या ठिकाणी घेऊन गेले होते. त्यावेळी मुलगा वडिलांपासून काही अंतरावर मोकळ्या जागी खेळत होता. वडील काही कामानिमित्त दुसरीकडे गेले त्याच वेळी पाच ते सहा भटक्या कुत्र्यांनी या मुलावर हल्ला केला. भटक्या कुत्र्यांनी या मुलाच्या शरीराचे अक्षरश लचके तोडले. उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल झाल्यानंतर देशभरात संताप व्यक्त करण्यात आला. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होऊ लागली. पण ढीम्म प्रशासनाने यावर काहीही उपाय केलेला नाही. 


छत्तीसगडमध्येही चिमुकलीचा बळी 
छत्तीसगडमध्ये गेल्याच महिन्यात भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात पाच वर्षांच्या एका मुलीला जीव गमवावा लागला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच वर्षाची सुकंती सकाळी 8 वाजता शौचास गेली होती. यावेळी भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली होती. दुर्देवाने उपचारापूर्वी या चिमुरडीचा मृत्यू झाला.