मुंबई: महापुरातून पश्चिम महाराष्ट्र आणि रायगडसह कोकण सावरत असतानाच पुन्हा एकदा टेन्शन वाढणार आहे. नुकतंच या महापुरातून सावरत असताना आता पुन्हा एकदा हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही भागांत 4 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातल्या काही भागांत 29 जुलै ते 2 ऑगस्ट या काळात पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे,  मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा या भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पूरग्रस्त भागांमधील अनेक ठिकाणी अजूनही पाणी ओसरलेलं नसल्यामुळे टेन्शन वाढलं आहे. 




चिपळून, महाड आणि पश्चिम महाराष्ट्रात पुराचा मोठा फटका बसला आहे. यातून सावरत असलेल्या नागरिकांसाठी आणखी टेन्शन वाढलं आहे. अनेक भागांत याआधी झालेल्या मुसळधार पावसानं दरड कोसळून मोठं नुकसान झालं. महाडच्या तळीयेत अख्खी वाडी दरडीखाली गेली. तर अनेक ठिकाणी रस्तेही खचले आहेत. आधीच पावसामुळे राज्यात मोठं नुकसान झालं आहे. यातून सावरत असताना हा अलर्ट हवामान विभागानं दिल्यानं सर्वांचं टेन्शन वाढलं आहे.


पिंपरी चिंचवडच्या विविध भागात आज पावसानं दमदार हजेरी लावली. सकाळी ढगाळ वातावरण होतं. पण संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमाराला विविध भागात मुसळधार पाऊस कोसळला. गेले काही दिवस पिंपरी चिंचवड शहरात पाऊस सुरूय. पण त्याचा जोर म्हणावा तसा नव्हता. आज मात्र संध्याकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्यानं शेतकरी समाधानी आहेत.