राज्यात मतदारांचा निरूत्साह, केवळ पाच टक्के मतदान
नेत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांकडूनच मतदान करण्याचं आवाहन
मुंबई : विधानसभेच्या मतदानाला सकाळी 7 वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे मतदारांनी लोकशाहीच्या या उत्सवात कमी सहभाग घेतला. राज्यात नऊ वाजेपर्यंत केवळ पाच टक्के मतदान झाल्याची नोंद झाली आहे. नेत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनीच मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. नेते आणि कलाकार मंडळींनी सकाळीच मतदान केलं पण सामान्य नागरिकांकडून मात्र निरूत्साह पाहायला मिळत आहे.
दिग्गज नेत्यांनी सकाळीच बजावला मतदानाचा हक्क, सरसंघचालक मोहन भागवत, बारामतीमध्ये अजित पवार, नागपूरमध्ये नितीन गडकरी यांनी पत्नीसह, मुख्यमंत्र्यांनी पत्नीसह मतदान केले आहे. तर एकनाथ खडसे आणि महाजनांनीही बजावला मतदानाचा हक्क. काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरातांनी देखील बजावला मतदानाचा हक्क.
बारामतीच्या काटेवाडीत पवार कुटुंबियांनी एकत्र मतदान केल्याचं चित्र पाहायला मिळाल. लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी सहभागी होण्याचं अजित पवारांचं आवाहन केलं. तर सुप्रिया सुळेंनीही बजावला मतदानाचा हक्क. लोकशाहीच्या उत्सवात सामाजिक कार्यकर्त्यांचा हिरीरीनं सहभाग घेण्याचे सगळ्यांकडून आवाहन केले जात आहे.
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या मंडळींनी देखील मतदान करून आपला हक्क बजावला आहे. विकास आमटे, बंग दाम्पत्य, यांनी देखील मतदान करून मतदान करण्याचं आवाहन जनतेला केलं आहे. सेलिब्रिटींमध्येही मतदानाचा उत्साह पाहायला मिळाला. अभिनेता अतुल कुलकर्णी पत्नी अभिनेत्री गितांजली कुलकर्णीसह गोरेगाव येथे मतदान करण्याकरता पोहोचले. प्रशांत दामले यांनी वर्सोवा येथे मतदान करून निवडणूक आयोगाचे त्यांनी कौतुक केले आहे. तसेच पद्मिनी कोल्हापुरे, किशोरी शहाणे-वीज यांनी देखील बजावला मतदानाचा हक्क.
आतापर्यंत झाले एवढे मतदान
कळवण
|
8.74
|
पंढरपूर |
3.2
|
नाशिक पश्चिम |
3.6
|
सटाणा
|
5 |
औरंगाबाद |
7 |
नवापूर |
7.58
|
अक्कलकोट |
6.56
|
पुणे |
5.14
|
नाशिक |
3.6
|
पनवेल |
5.13
|
उरण |
7.03
|
मुंबई |
5 |
शिर्डीत |
7
|
सिन्नर |
3.11
|
मालेगाव |
8.2 |