Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेस नेत्यांच्या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. जागा वाटपावरुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर वाद सुरु असतानाच ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटल्याच्या बातम्या समोर आल्या. या बातम्यांसंदर्भात वडेट्टीवार यांना विचारण्यात आलं असता त्यांनी या प्रश्नावरुन भारतीय जनता पार्टीचं नाव घेत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. 


'शिवसेनेचं दोन ठिकाणी बोलणं सुरु आहे'वर वडेट्टीवार म्हणाले...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसच्या स्थायी समितीची बैठक झाल्यानंतर विजय वडेट्टीवार हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्यासाठी आले. त्यावेळी त्यांना पहिला प्रश्न शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचा विचारला गेला. "महायुती तुटतेय, शिवसेना स्वबळावर लढणार अशा बातम्या समोर येत आहेत. मल्लिकार्जून खरगे यांच्याबरोबर जी बैठक झाली त्यामध्ये काँग्रेस नेत्यांनी असं सांगितलं की, शिवसेना दोन ठिकाणी बोलणं करत आहे. अमित शाहांची भेट झालेली आहे," असा प्रश्न वडेट्टीवार यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना विरोधी पक्ष नेत्यांनी, "ही चर्चा अजिबात झालेली नाही. भांडणं लावण्याचा पद्धतशीर प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून होत आहे. कारण राज्यात भारतीय जनता पक्ष हा घाबरलेला पक्ष आहे. मूळात अशी कुठलीही चर्चा झालेली नाही," असं उत्तर दिलं.


"पुढे जो काही पेच होता त्याचं..."


पुढे बोलताना, वडेट्टीवार यांनी, "संजय राऊतांना तुरुंगात कोणी घातलं आम्हाला माहिती आहे. या बातम्यांमध्ये अजिबात तथ्य नाही. आम्ही या बाबतीत हायकमांडकडे अजिबात चर्चा झालेली नाही. शिवसेना उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीबरोबर आहेत. आम्ही आघाडी म्हणून एकत्र लढणार आहोत. जागावाटपाचा प्रश्न उद्या संध्याकाळपर्यंत सुटलेला दिसेल. खरं तर ही बातमी आली कुठून? अशी कुठलीही चर्चा झाली नाही. आमची केवळ जागावाटपावर हायकमांडबरोबर चर्चा झाली. पुढे जो काही पेच होता त्याचं मार्गदर्शन आम्ही हायकमांडकडून घेत होतो. आता जी बातमी समोर आली आहे त्यामध्ये पॉइण्ट वन पर्सेंट सुद्धा तथ्य नाही. ही बातमी मुद्दाम पेरली गेली. काँग्रेसमध्ये आणि शिवसेनेमध्ये वाद निर्माण व्हावा हे काही लोकांचं षडयंत्र आहे. यात थोडंही सत्य नाही," असं म्हणाले. 


नक्की वाचा >> कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा CM? 'विरुष्का'चं अचूक भविष्य सांगणारा ज्योतिषी म्हणतो, 'ताऱ्यांची...'


"कोण कोणाशी भेटले हा..."


"संजय राऊतांनी अमित शाहांची भेट घेतल्याची चर्चा आहे," असं म्हणत विजय वडेट्टीवार यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा, "कोण कोणाशी भेटले हा त्यांचा प्रश्न. पण संजय राऊत अमित शाहांना भेटले याबद्दल आमची चर्चा हायकमांडबरोबर अजिबात झालेली नाही," असं उत्तर दिलं. 


नक्की वाचा >> पुढचा CM कोण? महायुतीचा मोठा निर्णय! शाह शिंदे, फडणवीस, पवारांना म्हणाले, 'कोणत्याही...'


अनेक जागांवरचे पेच सोडवले


शिवसेनेच्या नेत्यांबरोबर आमची चर्चा सतत सुरु आहे. अनेक जागांवरचा पेच सोडवला आहे. आम्ही पाच-सहा जागांचा तिढा सोडवला. केवळ सात-आठ जागांचा पेच शिल्लक राहिला आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकसंघ राहणार, असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.


नक्की वाचा >> ठाकरेंच्या उमेदवारांची संभाव्य यादी! मुंबईतील 8 जागांसहीत 31 जागांवर कोण कुठून लढणार पाहा


'उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत', यावर वडेट्टीवार म्हणाले...


यशोमती ठाकूर सकाळी बोलल्या की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हावेत या प्रश्नावर वडेट्टीवार यांनी, "त्यांचं ते वैयक्तिक मत असेल. अशी चर्चा तिन्ही पक्षांमध्ये कुठेही झालेली नाही," असं उत्तर दिलं.