राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अनेकदा आपले काका तसेच ज्येष्ठ नेते शरद पवारांना थेट सामोरे जाण्यास टाळाटाळ करताना दिलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आत्मविश्वास विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर वाढल्याचं चित्र दिसत आहेत. त्यामुळेच आज कराडमधील प्रितिसंगमावर वेळेत न पोहचल्याने शरद पवारांना भेटता न आल्याबद्दल अजित पवारांनी खंत व्यक्त केली. अजित पवारांनी स्वत: यासंदर्भात पत्रकारांशी बोलतान भाष्य केलं आहे. 


रोहित पवारांची भेट अन् अजित पवारांचा टोला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झालं असं की, अजित पवार माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला भेट देण्यासाठी पोहचले होते. तिथून निघताना अचानक त्यांची भेट शरद पवारांच्या पक्षातील आमदार आणि पुतणे रोहित पवार यांच्याशी झाली. त्यावेळी रोहित पवार त्यांच्या पाया पडले. यावेळेस अजित पवारांनी रोहित पवारांना चांगल्या कामासाठी शुभेच्छा दिल्या मात्र थोडक्यात सीट निवडून आल्याची आठवणही करुन दिली. "शाहण्या, थोडक्यात वाचलास. माझी एखादी सभा झाली असती तर..." असं म्हणत पाठीवर थाप मारली. याचा पार्श्वभूमीवर अजित पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी वेळेत अलो असतो तर शरद पवारांना भेटलो असतो असं सूचक विधान केलं. 


आमची पण साहेबांशी गाठ पडली असती


"आम्ही पण लवकर आलो असतो पण आमच्या पोलिसांनी आम्हाला तिकडे नेलं. नाहीतर कदाचित आमची आणि साहेबांची पण इथे गाठ पडली असती. मी मुश्रीफ साहेबांनी आणि सर्वांनी साहेबांचं दर्शन घेतलं असतं. आपल्यात वडीलधाऱ्यांचं दर्शन घेतलं असतं. तुमच्यामध्ये तुमच्या घरी वडीलधाऱ्यांचं दर्शन घेतातच ना?" असा प्रतिप्रश्न अजित पवारांनी विचारला. "प्रितिसंगमावर संगम बघायला मिळाला असता दादा," असं एका पत्रकाराने म्हणताच अजित पवारांनी आपल्या खास शैलीत, "अरे बरोबर आहे पण आता काय करतो. टायमिंग चुकलं रे. त्यामुळे मी डिपार्टमेंटवर पण चिडलो," असं म्हणाले.


नक्की वाचा >> CM पदाचा काही फॉर्म्युला ठरला आहे का? ऐकताच अजित पवार चिडून म्हणाले, 'आम्ही तिघे...'


पवारांमध्ये परत प्रितीसंगम?


"दादा परत पवारांमध्ये प्रितीसंगम होऊ शकतो का?" असा प्रश्न विचारण्यात आला असता अजित पवारांनी, "हे बघा आजचा दिवस हा आपल्या चव्हाण साहेबांचा स्मरण करण्याचा आहे. आमच्या मनात आदराची भावना आहे. चव्हाण साहेबांचा विचार कधीच विसरु शकणार नाही," असं म्हटलं.