Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election ) धर्तीवर बारामतीतून उमेदवारी मिळालेल्या (NCP Sharadchandra Pawar Party) राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या युगेंद्र पवार यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी कण्हेरी मारुतीच्या मंदिरात येऊन दर्शन घेत कुटुंबाची परंपरा कायम राखली. यावेळी सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाच्या कार्यकर्त्यांचीही उपस्थिती पाहायला मिळाली. घरी औक्षण झाल्यानंतर युगेंद्र पवार मंदिरात दाखल झाले आणि इथं दर्शन घेतल्यानंतर खासदार आणि नात्यानं आत्या लागणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी भाच्याला कानमंत्रही दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आत्या म्हणून (Yugendra Pawar) युगेंद्र यांच्यासाठी काय मागितलं? असं विचारलं असता, मी फक्त माध्या घरातल्या मोठ्यांचं आरोग्य उत्तम राहावं आणि लहानांना प्रेम मिळावं, बारामती मतदारसंघात युगेंद्र एकटा माझं कुटुंब नाही आम्ही कायम एक पक्ष म्हणून नव्हे, तर एक कुटुंब म्हणून काम केलं असं म्हणत हीच परंपरा पुढं जाईल असा विश्वास व्यक्त केला. 


आपल्या भागात चांगला पाऊस पडूदे अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळूदे अशी प्रार्थना मारुतिरायाकडे केल्याचं सांगताना त्यांनी युगेंद्रपुढे बारामतीकरांशी असणारं नातं अधोरेखित केलं. 'आम्ही हे नातं प्रेमानं विणलेलं नातं आहे. माझ्यासाठी नात्यांचं अनन्यसाधारण महत्त्वं आहे. बारामती हा गड नाही, ही सेवा आहे. गेली 6 दशकं पवार साहेबांवर इथून जो विश्वास आणि प्रेम तमान जनतेनं दाखवलं आहे यासाठी मी त्या जनतेपुढं नतमस्तक होते', असं त्या म्हणाल्या. 


 बारामतीकरांची ताकद... 


आपलं कुटुंब एक इतकं लहा नकुटुंब होतं की कोण ओळखत नव्हतं. पण, ही महाराष्ट्र आणि बारामतीकरांची ताकद असून, काश्मीर ते कन्याकुमारी तुम्ही कुठेही गेलात तर, शरद पवारांची बारामती म्हणून आज हे ठिकाण ओळखली जाते. हे अतुट प्रेमाचं विश्वासाचं नातं आहे असंही त्या म्हणाल्या. 



पवार कुटुंबाची कण्हेरी मारुती मंदिरात येण्याची परंपरा... 


माध्यमांशी संवाद साधताना कण्हेरी मारुतिशी पवार कुटुंबाचं असणारं नातं आणि विश्वासही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. 'आजी- आजोबांचा विश्वास असल्यामुळं त्यांच्यासह घरातल्या सर्व काकांनी ठरवलेलं की जेव्हा जेव्हा निव़डणूक लढवू तेव्हातेव्हा या मारुतिचं दर्शन घेऊ कारण, पवार कुटुंब काटेवाडीचं आहे. त्यामुळं इथं येऊन आम्ही कायम मारुतिचं दर्शन घेत असतो. आप्पासाहेब पवार, तात्यासाहेब पवार आणि माधवराव पवार यांचा आशीर्वाद शरद पवारांवर गेली 6 दशकं राहिला आहे, त्याला जोड आहे बारामतीकरांच्या आशीर्वादाची', असं म्हणत बारामती आणि पवार कुटुंबाचं समीकरण त्यांनी सर्वांपुढे आणलं.