Maharashtra Election: 288 मतदारसंघात 7995 उमेदवार... `या` मतदारसंघात तर तब्बल 99 जण रिंगणात
Maharashtra Assembly Election 2024 Total Number Of Candidates: महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी किती उमेदवार मैदानात आहेत आणि सर्वाधिक अर्ज कुठून आलेत ही माहिती समोर आली आहे.
Maharashtra Assembly Election 2024 Total Number Of Candidates: महाराष्ट्रातील विधासभेच्या 288 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपलेली आहे. 29 ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. राज्यातून एकूण 7 हजार 995 उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत. या जवळपास 8 हजार उमेदवारांनी एकूण 10 हजार 905 अर्ज केले आहे आहेत. यासंदर्भातील माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षीची निवडणूक ही अधिक रंजक होणार असून निकालांवर अपक्षांचा प्रभावही मोठ्या प्रमाणात असेल असं उमेदवारांची संख्या पाहून सांगितलं जात आहे.
मुंबईतून दाखल झाले इतके अर्ज
अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यात एकूण 618 उमेदवारांनी 778 अर्ज भरले आहेत. यापैकी मुंबईत अणुशक्तीनगर मतदारसंघात सर्वाधिक 37 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. दिंडोशी मतदारसंघातून 32, मानखुर्द-शिवाजीनगर 29, चांदिवली 27, जोगेश्वरी 25 आणि मुंबईत उत्तर मतदारसंघात दाखल झालेल्या अर्जाची संख्या 20 च्या आसपास आहे.
या मतदारसंघातून 99 उमेदवार
पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघासाठी 1272 उमेदवारांनी 2506 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. दौंड आणि कसबा मतदारसंघातून सर्वांत कमी 42 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले. तर पिंपरी विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक 99 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. आज म्हणजेच 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडणार आहे. 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येईल. मतदान 20 नोव्हेंबरला होत असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
नक्की वाचा >> अर्ज भरतानाच सरवणकरांचा मास्टर स्ट्रोक! आता स्वत: CM शिंदे, राजही काही करु शकत नाहीत; कारण...
निवडणूक कालावधीत चार दिवस मद्य विक्री
नागपुरात 18 नोव्हेंबरपासून 20 नोव्हेंबरपर्यंत आणि 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणीच्या दिवशी मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघांत निवडणूक कालावधीत म्हणजेच 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेपासून 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यत तसेच 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणीच्या दिवशी संपूर्ण जिल्ह्यात मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी जारी केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करून मद्य विक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांची अनुज्ञप्ती रद्द करण्यात येईल, तसेच फौजदारी कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.