Mahayuti Press Conference: महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांना एकत्र पत्रकार परिषद घेत राज्यातील जनतेचे आभार मानले. दरम्यान संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बॅलेट पेपरने निवडणूक घेण्याची मागणी केली असता त्यावरही उत्तर दिलं. महायुतीला 225 जागा मिळत असल्याचं दिसत असून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. यात भाजपाला तब्बल 130, शिवसेनेला 54 आणि राष्ट्रवादीला 41 जागा मिळत आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीला 50 जागा मिळत आहेत. दरम्यान संजय राऊत यांनी बॅलेट पेपर म्हणजेच मतपत्रिकावर पुन्हा निवडणूक घ्या!, अशी मागणी केली आहे. त्यावरही अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"महाराष्ट्राचा निकाल हा जनतेचा कौल नाही. बॅलेट पेपर म्हणजेच मतपत्रिकावर पुन्हा निवडणूक घ्या!," अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. जगाच्या पाठीवर निवडणुकीत इतका फ्रॉड झाला नसेल, असे राऊत म्हणाले. हा निकाल मान्य नाही! नाही! त्रिवार नाही लोकशाही आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची  लढाई सुरूच राहील, असेही राऊत पुढे म्हणाले. संजय राऊतांच्या या विधानाबद्दल विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांनी कोण संजय राऊत? अशी विचारणा केली. यानंतर अजित पवार 'ईव्हीएमचा निर्णय मान्य आहे, मान्य आहे, मान्य आहे' असा निर्णय देतच उठले. त्यावर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वजण हसू लागले. 


'आता आपल्याला....', महायुतीचं सरकार येताच अजित पवारांचा फडणवीसांना फोन, 'मी राजकारणात आल्यापासून...'


 


अजित पवार म्हणाले की, "आज सकाळी मतमोजणी सुरु होईपर्यंत सर्वणज अंदाज व्यक्त करत होते. आम्ही तिघं कशातच जमा नव्हतो. आम्ही पावणे दोनशेच्या पुढे जाऊ की नाही असं वाटत होतं. पण महाराष्ट्रातील जनतेते विकासाकडे पाहून यश मिळवून दिलं आहे, त्याबद्दल मी आभार मानत आहेत. सगळे कार्यकर्ते, उमेदवार राबले. आमच्या योजनांची मस्करी करण्यात आली, दोष देण्यात आला". 



"लोकसभेत आम्हाला मोठं अपयश आलं होतं. पण ते मिळालं, मान्य केलं, त्यातून पुन्हा सावरण्याचा प्रयत्न केला. लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. सगळे उताणे पडले. पण उलट आता आमच्यावर जबाबदारी वाढली आहे. मी राजकारणात आल्यापासून महायुती किंवा आघाडीला इतकं मोठं यश मिळाल्याचं ऐकिवात नाही. अलीकडच्या काळात इतकं मोठं यश पहिल्यांदाच मिळालं आहे. आता खूप काम करावं गाले असं देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन सांगितलं. केंद्र सरकार पाठीशी असल्याने भक्कम आधार आहे," असंही अजित पवार म्हणाले. 


Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रातील पहिला निकाल हाती, कालिदास कोळंबकरांचा जागतिक विक्रम, नवव्यांदा विधानसभेवर


 


संजय राऊत यांनी बॅलेट पेपरेने पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. त्यावर ते म्हणाले की, "बॅलेट पेपरेने लोकसभेतही घ्यायला होतं". 


"सगळीकडे महायुती जोरात चालली आहे. जनतेचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. महायुती शेवटपर्यंत कशी काम करेल यासाठी प्रयत्न करु. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करु," असंही अजित पवारांनी सांगितलं. 


देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आम्ही नतमस्तक आहोत. हा विजय आमची जबाबदारी वाढवणारा आहे. नरेंद्र मोदींवर जनतेने दाखवलेला हा विश्वास आहे. महाराष्ट्रात खूप काम करावं लागणार याची जाणीव होत आहे. आम्ही महाराष्ट्रातील जनतेपुढे नतमस्तक होऊन विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असं आश्वासन देतो".