Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रातील पहिला निकाल हाती, कालिदास कोळंबकरांचा जागतिक विक्रम, नवव्यांदा विधानसभेवर

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. वडाळा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार कालिदास कोळंबकर विजयी झाले आहेत. कालिदास कोळंबकर यांनी सलग नवव्यांदा विधानसभा निवडणूक जिंकण्याचा रेकॉर्ड केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Nov 23, 2024, 12:33 PM IST
Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रातील पहिला निकाल हाती, कालिदास कोळंबकरांचा जागतिक विक्रम, नवव्यांदा विधानसभेवर title=

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. वडाळा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार कालिदास कोळंबकर विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे कालिदास कोळंबकर यांनी सलग नवव्यांदा विधानसभा निवडणूक जिंकण्याचा रेकॉर्ड केला आहे. म्हणजेच गेल्या 40 वर्षांपासून ते सलग जिंकत आहेत. आधी शिवसेना, नंतर काँग्रेस आणि आता भाजपात असलेल्या कालिदास कोळंबकर यांचा वडाळा बालेकिल्ला आजपर्यंत अभेद्य ठरला आहे. कालिदास कोळंबकर हे नारायण राणेंचे कट्टर समर्थक आहेत. 

लाडकी बहीण योजनेमुळे महायुती जिंकली? संजय राऊतांनी एका वाक्यात दिली प्रतिक्रिया, म्हणाले....

 

राज्यातील सर्व जागांचे कल हाती आले असून, पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होणार हे आता स्पष्ट झालं आहे. लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करणाऱ्या महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र महायुतीने बहुमत मिळवत मोठा झटका दिला आहे. 

कालिदास कोळंबकर नवव्यांदा विजयी

वडाळ्यातून भाजपाचे उमेदवार कालिदास कोळंबकर यांना 66 हजार 800 मतं मिळाली आहेत. 24 हजार 973 मतांनी त्यांनी निवडणूक जिंकली आहे. त्यांच्यासमोर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या श्रद्धा जाधव यांचं आव्हान होतं. त्या मुंबईच्या माजी महापौरही आहेत. त्यांना 41827 मतं मिळाली आहेत. तसंच मनसेच्या स्नेहल जाधव यांना 6972 मतं मिळाली. 

कालिदास कोळंबकर आता पर्यंत 8 वेळा सलग निवडून आले आहेत. कालिदास कोळंबकर हे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत होते. ते नाराणय राणेंचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांनही शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली होती. नारायण राणेंसह त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 2014 ला मोदी लाटेतही कोळंबकर जिंकून आले होते. नंतर नारायण राणेंनी भाजपात प्रवेश केल्यानंतर कालिदास कोळंबकरांनीही काँग्रेसला रामराम ठोकला होता. 2019 मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि पुन्हा एकदा निवडणूक जिंकली. 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी नवव्यांदा अर्ज भरला.