Maharashtra Assembly Election Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीमधील काही गावांना प्रचारानिमित्त भेटी देत आहेत. त्यापैकी ढाकाळे येथील गावकऱ्यांसमोर भाषण करताना अजित पवारांनी केलेल्या एका विधानामुळे चर्चेला उधाण आलं आहे. अजित पवारांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचायला उशी झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत भाषणाला सुरुवात केली. "उद्याच्या निवडणुकीत घडाळ्याच्या शेजारचं बटन दाबण्याचे पवित्र काम बारामतीकरांनी करावं ही विनंती करतो. अजित पवारांनी यावेळेस आपण साहेबांना म्हणजेच शरद पवारांना सोडलेलं नाही असं विधान केलं.


कामांचा पाढाचा वाचून दाखवला...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाषणाच्या सुरुवातीला अजित पवारांनी सिंचनासाठी केलेल्या कामांचा पाढा वाचला. "1991 ला मी खासदार झालो. पुरंदर उपसा सिंचन योजना केली त्यावर माझी सही आहे. पुरंदरबरोबर बारामतीची पण जिरायती गावे त्यात समाविष्ठ केली. या योजनेचे काम सुरु आहे. त्यासाठी 52-54 कोटी रुपये खर्च करतो आहे. सोमेश्वर कारखान्याला ती योजना चालवण्यासाठी देत आहे. सोलरवर ही योजना असेल. जानाई शिरसाई उपसा सिंचन योजना ही आपण राबवत आहोत. त्याची कामे सुरु आहेत," असं अजित पवार म्हणाले.


निवडणूकीनंतर मी स्वत: तिथे जाऊन...


भविष्यात लाईट बिलाचा प्रश्न येणार नाही, असं अजित पवार म्हणाले. "साहेब (शरद पवार) चारदा मी पाचदा उपमुख्यमंत्री झाले आमचं पाण्याचं काय? असा तुमचा प्रश्न आहे, तो मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरु आहे. 461 कोटी रुपये त्यासाठी खर्च करत आहोत. क-हा निरा योजनेत जी गावे राहिली त्याचा अंतर्भाव करत आहोत. त्यासाठी 1000 कोटी रुपये खर्च करत आहोत. निवडणूकीनंतर मी स्वत: तिथे जाऊन भेट देणार आहे. पुरंदरचा फायदा होणार आहे. पुणेकर 22 टीएमसी पाणी पितात, खडकवासला 7-8 टीएमसी पाणी वारतात. यापुढे वेळच्या वेळेला पाणी येईल. भाटघर भरुन पाणी वीरला येते. ते पाणी निरा चंद्रभागा कर्नाटकातून समुद्राला जाते. ही योजना सोलरवर राबवणार आहे. लाईट बिलाचा प्रश्न येणार नाही," असं अजित पवारांनी म्हटलं. 


दिवसा वीज वापरुन रात्री देखील...


"10 हजार मेगावॅट वीज लागणार असेल तर 20 हजार मेहावँट वीज तयार करण्याच्या बाबतचं पॅनेल टाकणार. दिवसा वीज वापरुन रात्री देखील पुरवठा केला जाईल. तुम्हाला फक्त पाणी पट्टी येईल. पाईपव्दारे पाणी देणार. 1 टीएमसी पाणी तुमच्यासाठी आरक्षित केले आहे. पावसाळ्यानंतर ते तुम्हाला अधून मधून देता येईल. यामुळे बारामती भागातला जिरायत हा शब्द निघून जाईल," असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला. 


नक्की वाचा >> राज ठाकरेंच्या 'फडणवीस मुख्यमंत्री होणार' विधानावर शिंदे पहिल्यांदाच बोलले! 4 शब्दांत उत्तर


मी साहेबांना सोडलेलं नाही, सगळ्याच...


पुढे बोलताना अजित पवारांनी, "कोरोनात अडीच वर्षे तिथे वाया गेली," असं म्हटलं. त्यानंतर अजित पवारांनी, "तुम्हाला वाटत असेल या वयात अजित पवारांनी साहेबांना सोडायला नको होतं. मी साहेबांना सोडलेलं नाही. सगळ्याच आमदारांचे मत होतं सगळ्यांच्या सह्या होत्या," असं सूचक विधान केलं. अजित पवारांच्या या विधानाने राज्यामध्ये नवीन चर्चांना उधाण येण्याची शक्यता आहे. 


लोकसभेला साहेबांना मतदान दिलं, आता मला...


"घरातून दोन उमेदवार असल्याने तुमची पंचायत झाली आहे. मी पण कामाचा माणूस आणि साहेब ही दैवत असं झालं. लोकसभेला साहेबांना मतदान दिलं. आता मला विधानसभेला मत द्या. माझी खूपच गंमत केली न सांगितलेलं बरं! मेहरबानी करा. गावोगावी गावच्या पुढा-यांवर नाराजी खूप आहे. गावक-यांनी काही नोकरीसंदर्भात प्रश्न मांडले. कारखान्यात सभासद नसणा-या गावातील लोकांची नोकर भरती केली जात आहे. आमदाराचं काय काम असतं? तुम्हाला सुविधा पुरवणं, सेवा देणं पण निवडणूक आली की असा मुद्दा काढायचा आणि कात्रित पकडायचं हे मी मान्य करतो," असं अजित वपार म्हणाले.



त्यातून हजार कोटी काढणे म्हणजे किरकोळ


"मंजूर केलेला कामाला त्यावेळी सरकारने स्टे दिला मी विरोधी पक्ष नेता होतो. पाच वर्षात माझी अडीच वर्षे वाया गेली तरी देखील 9 हजार कोटी बारामतीकरांना दिले. मी अर्थमंत्री असल्यामुळे एवढा निधी बारामतीकरांना देऊ शकलो. माझ्याकडे साडेसात आठ लाख कोटी रुपयांचे बजेट असतं त्यातून हजार कोटी काढणे म्हणजे किरकोळ आहे. त्यासाठी तुमची साथ हवी आहे," असं अजित पवार उपस्थितांना म्हणाले.