`इंदिरा गांधी स्वर्गातून परत आल्या तरी...`, प्रचाराच्या रणधुमाळीत अमित शाहांचं मोठं विधान
महाराष्ट्राच्या निवडणूक प्रचारात अमित शाह (Amit Shah) काश्मीरमधील (Kashmir) कलम 370चा मुद्दा जोरकसपणे मांडत आहेत. कलम 370 पुन्हा लागू करुच देणार नाही अशी भूमिका अमित शाहांनी घेतली आहे.
महाराष्ट्राच्या निवडणूक प्रचारात अमित शाह काश्मीरमधील कलम 370चा मुद्दा जोरकसपणे मांडत आहेत कलम 370 पुन्हा लागू करुच देणार नाही अशी भूमिका अमित शाहांनी घेतली आहे. राहुल गांधींवर टीका करताना त्यांनी थेट इंदिरा गांधींचा विषय काढला आहे. इंदिरा गांधी स्वर्गातून परत आल्या तरी कलम 370 पुन्हा काश्मीरात लागू होणार नाहीत असं अमित शाहा म्हणाले आहेत.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काश्मीरमधील कलम 370 हटवल्याचा मुद्दा भाजपकडून उपस्थित केला जात आहे. महाविकास आघाडी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी हे कलम 370चे समर्थक असल्याचा आरोप सातत्यानं भाजपकडून केला जातोय. काश्मीर विधानसभेत कलम 370 बहाल करण्यासाठी झालेल्या ठरावाचा मुद्दाही अमित शाहांनी उपस्थित केला. कलम 370बाबत बोलताना अमित शाहांनी इंदिरा गांधी स्वर्गातून आल्या तरी कलम 370 पुन्हा काश्मीरमध्ये लागू होणार नाही असं वक्तव्य केलं आहे.
अमित शाहांनी केलेल्या टीकेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी सडेतोड उत्तर दिलं आहे. इंदिरा गांधींवर टीका करणारे अमित शाहा त्यांच्यासमोर अगदीच लहान असल्याचा टोला खरगेंनी लगावला आहे.
अमित शाहांनी निवडणुकीच्या प्रचारात सातत्यानं राहुल गांधींना टीकेचं लक्ष्य केलं आहे. हे करताना ते कलम 370चा मुद्दा उपस्थित करतात. कलम 370 हटवण्याच्या निर्णयाचं समर्थन करताना त्यांनी इंदिरा गांधींचाही अपमान केलाय. एवढं करुनही कलम 370चा मुद्दा महाराष्ट्राच्या मतदारांना हा मुद्दा भावणार का अशी चर्चा या निमित्तानं सुरु झालीय.