तळकोकणातील कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. कुडाळ मतदारसंघाबाबत नारायण राणेंनी भेट घेतल्यानंर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उदय सामंत यांना तातडीने भेटण्यासाठी बोलावलं आहे. तळकोकणातील कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघासंदर्भात उदय सामंत यांच्याशी मुख्यमंत्री चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. माजी खासदार निलेश राणे कुडाळमधून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असून, ते भाजपाच्या की शिवसेना शिंदे पक्षाच्या चिन्हावर ही निव़डणूक लढवणार याबाबत लवकरच निर्णय होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपा नेते नारायण राणे यांची आज वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना तातडीने वर्षा निवासस्थानी भेटण्यासाठी बोलवलं आहे. कुडाळ-मालवण विधान सभा मतदारसंघासंदर्भात उदय सामंत यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 


अमित शाह-एकनाथ शिंदे भेट


मंगळवारी रात्री उशिरा सह्याद्री अतिथीगृहामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक झाली.  या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांना महायुतीचं सरकार आणू अशी ग्वाही दिल्याची सूत्रांची माहिती आहे. तसंच जागावाटप लवकर जाहीर करण्याची विनंतीही शिंदेंनी अमित शाहांकडे केली आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेत जागावाटप आणि उमेदवार घोषित करण्यास उशीर नको अशीही विनंती त्यांनी अमित शाहांकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. शिवसेनेला कोणत्या जागा हव्या आहेत याची सविस्तर माहिती शिंदेंनी शांहाना दिली. तसेच मतभेद विसरून कुटुंबाप्रमाणे निवडणूक एकत्र लढा असा सल्ला  शाहांनी दिल्याचं समजत आहे. 


भाजपाचा लिफाफा पॅटर्न


विधानसभा निवडणुसाठी  भाजपाचा एक नवा लिफाफा पॅटर्न सुरू करण्यात आला आहे. बिहार आणि गोवा पॅटर्ननुसार यंदाचे विधानसभा उमेदवार ठरणार असल्याची माहिती आहे. भाजपाचे निरीक्षक प्रत्येक मतदारसंघात जाऊन इच्छुकांच्या भेटी तसेच पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून कोण उमेदवार असायला हवा याची माहिती घेतली जाईल. त्यानंतर ज्या नेत्याच्या नावाला पसंती देण्यात आली त्यांचं नाव बंद लिफाप्यात वरिष्ठांना सादर केलं जाणार आहे.


महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा आज सुटणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होतोय. मुंबईमध्ये सुरू असलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत 25-30 जागांवर तिढा कायम असल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे. तर महाविकास आघाडीच्या 288 पैकी 260 जागांवर सहमती झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. प्रत्येक विभागातील तीन-चार जागांवर अद्याप तोडगा निघाला नसल्याची माहिती समोर येत आहे.